Malavika mohanan Weight Loss : काहींना बारीक व्हायचं असतं तर काहींना जाड या वजन वाढवण्याच्या आणि कमी करण्याच्या प्रक्रियेमध्ये आपला जीव नकोसा होतो. वाढत्या वजनामुळे आपल्याला अनेकदा ट्रोलही केलं जातं.

कुटुंब, नातेवाईक, मित्रपरिवार यांच्याकडून नेहमीच आपल्याला ऐकावे लागते. वजन कमी करणे, ट्रान्स्फॉर्मेशन आणि जिममध्ये तासन् तास घाम गाळणे किंवा स्वत:ला फिट ठेवणे हे चित्रपटसृष्टीत प्रत्येक कलाकाराला करावे लागते. कलाकार त्यांचा वजन घटवण्याचा प्रवास नेहमीच आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करीत असतात.

दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुंदर अभिनेत्री मालविका मोहनन सध्या तिच्या वजन कमी करण्यामुळे चर्चेत आहे. खरे तर, मालविकाने फक्त १५ दिवसांत आठ किलो वजन कमी केले आणि तिचे वजन मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे ऐकून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.

इतक्या कमी वेळात आठ किलो वजन कमी करणे खूप अस्वास्थ्यकर आणि हानिकारक मानले जाते. दुसरीकडे मालविकाने स्वतः एका मुलाखतीत कबूल केले की, तिने फक्त दोन आठवड्यांत आठ किलो वजन कमी केले आणि त्यासाठी तिने क्रॅश डाएटसारख्या पद्धतींचा अवलंब केला, ज्या डॉक्टर नेहमीच अस्वास्थ्यकर म्हणून वर्णन करतात. तिने एका मुलाखतीत तिचा डाएट प्लॅन सांगितला आहे.

चित्रपटासाठी वजन कमी केले

मालविका लवकरच प्रभासबरोबर ‘द राजा साब’ या चित्रपटात दिसणार आहे. मालविका मोहननने मुलाखतीत सांगितले की, ती ‘थंगलान’ आणि ‘बियॉण्ड द क्लाउड्स’ या चित्रपटांसाठी शूटिंग करत होती. या चित्रपटांमध्ये तिला खूप बारीक दिसायचे होते. त्याच वेळी ‘थंगलान’दरम्यान ते काही स्टंट सीनदेखील करीत होते. अ‍ॅक्शन सीन्ससाठी तिला वजन खूप कमी करण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे अभिनेत्रीने वजन लवकर कमी करण्यासाठी कठोर आहार आणि व्यायाम यांची मदत घेतली. मालविका म्हणाली की, हा तिच्यासाठी खूप कठीण टप्पा होता. कारण- मी जे काही खात होते, त्यापेक्षा जास्त कॅलरीज बर्न करीत होते. त्यामुळे माझे वजन खूप कमी झाले.

मालविका म्हणाली, “एका भूमिकेसाठी त्यांनी मला सांगितले की, मला माझ्या शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करावे लागेल. म्हणूनच मी लो कार्ब डाएट घेत होते. मी ३ मिल डाएट फॉलो केले. पण, दिवसभरात मी फक्त एक सफरचंद आणि एक अंडे (पांढरा भाग) खात असे. त्याशिवाय मी दुसरे काहीही खाल्ले नाही आणि दिवसभर स्वतःला उपाशी ठेवले.” मालविका म्हणाली की, असा आहार घेणे हे खूप धोकादायक काम आहे आणि मी कधीही इतर कोणालाही असा आहार घेण्याचा सल्ला देणार नाही.

काही काळापूर्वी चित्रपट निर्माते बोनी कपूर यांनी खुलासा केला होता की, त्यांची पत्नी व प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवीदेखील बारीक दिसण्यासाठी क्रॅश डाएट पाळत असत. श्रीदेवी दिवसभर उपाशी राहायच्या आणि खूप कमी जेवण करायच्या. या कारणामुळे बऱ्याचदा श्रीदेवी बेशुद्ध व्हायच्या. बोनी कपूर यांनी सांगितले होते की, श्रीदेवी त्यांच्या मृत्यूपूर्वी काही काळ क्रॅश डाएटवर होती.

मालविका लवकरच प्रभासबरोबर ‘द राजा साब’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा टीझर आला आहे आणि चाहते तो पाहून खूप आनंदी आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.