बॉलिवूडची अभिनेत्री नीना गुप्ता यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक चांगले चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले. यानंतर अचानक नीना यांना काम मिळणे बंद झाले. त्यानंतर त्यांना सोशल मीडियावर कामासाठी विनवणी करावी लागली. जेव्हा ‘बधाई हो’ प्रदर्शित झाला तेव्हा प्रेक्षकांना नीना यांचा अभिनय खूप आवडला होता. आता नीना यांच्याकडे कामाची कमतरता नाही आणि ‘पंचायत’ या वेब सीरिजमधली भूमिका तर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. पण नीना यांना विश्वास होतं नाही आहे की प्रेक्षक त्यांना पसंत करत आहेत आणि त्यांना चांगल मानधन देखील मिळत आहे.
आणखी वाचा : शिल्पा शेट्टीच्या वाढदिवसाच्या दिवशी, शमिता आणि राकेश बापटचा झाला ब्रेकअप?
गेल्या काही काळापासून नीना या वेगवेगळ्या भूमिका साकारत आहेत. याविषयी ‘हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत नीना म्हणाल्या, ‘एखाद्या अभिनेत्याला नेहमीच नवीन भूमिका साकारण्याची इच्छा असते. प्रत्येक वेळी एकच पात्र साकारायला कोणालाच आवडत नाही. पण जे ऑफर केलं जात आहे त्यातून आपणं निवडायला हवं. मी आता अशा स्थितीत आहे की मला वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका मिळत आहेत. मी शॉर्ट्स घालते म्हणून माझी प्रतिमा शहरी मुलगी म्हणून निर्माण झाली होती, पण ‘बधाई हो’ नंतर मी मध्यमवर्गीय गृहिणी अशी भूमिका करू शकते असे लोकांना वाटले. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच माझ्याकडे भूमिका निवडण्याचा पर्याय आहे. त्याआधी मला नाही म्हणायची संधी नव्हती. या वयात मला अशा विविध प्रकारच्या भूमिका साकारायला मिळत आहेत याचा मला खूप आनंद आहे.
आणखी वाचा : Kon Honar Crorepati 6 : “मी मराठीतून प्रश्न विचारणार”, हे ऐकताच काजोलन केले असे काही
आणखी वाचा : अक्षयला होती सासू डिंपल कपाडियासोबत डेटवर जाण्याची इच्छा, कारण…
दरम्यान, नीना गुप्ता सध्या त्यांचा आगामी चित्रपट ‘गुडबाय’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. विकास बहल दिग्दर्शित या चित्रपटात त्यांच्यासोबत अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदाना दिसणार आहेत. याशिवाय त्या अमिताभ बच्चन, अनुपम खेर आणि बोमन इराणी यांच्यासोबत ‘उचाई’ या चित्रपटातही दिसणार आहे.