अभिनेत्री नेहा पेंडसे सध्या मालिका, चित्रपटांपासून दूर आहे. पण तिने आजवर मराठीसह हिंदी, दाक्षिणात्य चित्रपटामध्ये काम केलं. इतकंच नव्हे तर छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस १२’ कार्यक्रमामध्येही तिने सहभाग घेतला होता. ‘भाभीजी घर पर है’’ ही तिची शेवटची हिंदी मालिका. काही दिवसांपूर्वी तिचा ‘जून’ हा मराठी चित्रपट येऊन गेला होता. नेहा सोशल मीडियावर सक्रीय असते. तितकीच ती सडेतोड स्वभावामुळे प्रसिद्ध आहे. आपली मतं ती ठामपणे मांडत असते.

नेहा पेंडसेचे आज अनेक चाहते आहेत. अभिनेत्रींचे खासगी आयुष्यदेखील चर्चेत असते. तिने व्यावसायिक असलेल्या शार्दूल शार्दुल सिंग बायस याच्याबरोबर लग्नगाठ बांधली. शार्दूलने आधी २ लग्न केली होती त्यावरून अनेकांनी नेहा पेंडसेला ट्रोल केलं होत. या संपूर्ण प्रकरणावर नेहाने एका मुलाखतीत आपली प्रतिक्रिया दिली होती. ती असं म्हणाली “शार्दूलची दोन लग्न झाली आलेत तर त्यात इतकं काय? आज अनेकजण वेगवेगळ्या कारणांसाठी लग्न करत असतात. लग्न करण्याआधी प्रत्येक व्यक्तीचे रिलेशन असतेच. लग्नाआधी आपण जर एखाद्या बरोबर नात्यात असू तर त्यामध्ये प्रेम, शारीरिक जवळीक असतेच मात्र याला कायदेशीर मान्यता नसते. मग शार्दूल घटस्फोटित असल्यबद्दल का बोललं जात आहे? मीपण व्हर्जिन आहे असं नाही. मी त्याचे कौतुक करते कारण त्याचे प्रेम ज्या स्त्रीवर होते त्यांच्याशी त्याचे लग्न झाले मात्र माझ्याबाबतीत उलटे झाले माझे असलेले नातेसंबंध लग्नापर्यंत पोहचू शकले नाहीत.”

View this post on Instagram

A post shared by Nehha Pendse (@nehhapendse)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुलाखतीत तिने पुढे सांगितले की “आम्ही एकमेकांच्या भूतकाळाला स्वीकारले असून आम्ही आता खूष आहोत.” नेहाने आपल्या कारकिर्दीची सुरवात बालकलाकार म्हणून केली आहे. ‘प्यार कोई खेल नही’ या हिंदी चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘दाग द फायर’, ‘देवदास’ या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच झी वाहिनीवरील ‘भाग्यलक्ष्मी’ या मराठी मालिकेने तिला वेगळी ओळख निर्माण करून दिली.