scorecardresearch

Video : “दारूच्या नशेमध्ये आहेस का?” मध्यरात्री पार्टीमधून बाहेर पडताच निक्की तांबोळीला चालणंही झालं कठीण, व्हिडीओ व्हायरल

अभिनेत्री निक्की तांबोळीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहे.

Video : “दारूच्या नशेमध्ये आहेस का?” मध्यरात्री पार्टीमधून बाहेर पडताच निक्की तांबोळीला चालणंही झालं कठीण, व्हिडीओ व्हायरल
अभिनेत्री निक्की तांबोळीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहे.

हिंदी ‘बिग बॉस’च्या १४व्या पर्वामध्ये अभिनेत्री निक्की तांबोळी सहभागी झाली. या शोमुळे निक्की प्रकाशझोतात आली. त्यानंतर ‘खतरों के खिलाडी’ या कार्यक्रमामध्येही तिने सहभाग घेतला. याआधी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये निक्कीने बरंच काम केलं आहे. काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये ती उत्तमोत्तम भूमिका साकारताना दिसली. सतत सोशल मीडियावर चर्चेत असणारी निक्की आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.

आणखी वाचा – “ताज हॉटेलमध्ये पहिल्यांदा गेले अन्…” एका चहाची किंमत पाहून हेमांगी कवीच्या भुवया उंचावल्या

कलाकार मंडळींचे पार्टीचे व्हिडीओ तसेच फोटो याबाबत सोशल मीडियावर अधिकाधिक चर्चा रंगताना दिसते. निक्कीच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं आहे. निक्की ब्रालेट टॉप आणि मिनी स्कर्ट परिधान करत मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका पार्टीमध्ये पोहोचली होती. यावेळी तिचा बोल्ड लूक पाहायला मिळाला. पार्टी संपल्यानंतर बाहेर येताच पापाराझी छायाचित्रकारांनी तिला घेरलं.

पाहा व्हिडीओ

यावेळी निक्की तिचा मित्र शर्दुल पंडितबरोबर होती. निक्कीने बोल्ड ड्रेसवर घातलेल्या हाय हिल्समध्ये चालणं कठीण झालं होतं. यावेळी शार्दुलने तिला पकडलं. पण निक्कीचा लूक आणि बोलणं पाहून नेटकऱ्यांनी मात्र तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. या व्हिडीओमध्ये “मला हिल्स खूप आवडतात. अजूनही पार्टी सुरुच आहे. मला कामासाठी सकाळी पाच वाजता निघायचं आहे.” असं निक्की बोलताना दिसत आहे.

आणखी वाचा – विजय देवरकोंडाची जादू फिकी, अवाढव्य खर्च, जबरदस्त प्रमोशन करूनही ‘लायगर’ला थंड प्रतिसाद

निक्कीचं हे रुप पाहून नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत. तू दारू अधिक प्यायली आहेस का?, निक्की दारूच्या नशेमध्ये आहेस का? अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तिचा हा व्हिडीओ काही तासांमध्येच सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. इतर अभिनेत्रींप्रमाणेच पार्टी लूकमुळे निक्की देखील चर्चेत आली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.