‘स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून प्राजक्ता गायकवाडला ओळखले जाते. प्राजक्ता ही सोशल मीडियावर फार सक्रीय असते. प्राजक्ता गायकवाड हिच्या आजोबांचे नुकतंच निधन झाले. यानिमित्ताने तिने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. सध्या तिची ही पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे.

प्राजक्ता गायकवाडच्या आजोबांचे नुकतंच निधन झाले. आजोबांच्या निधनानंतर प्राजक्ता ही फार भावूक झाली आहे. या निमित्ताने तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच तिने यासोबत एक भावनिक पोस्टही शेअर केली आहे.

प्राजक्ता गायकवाडची इन्स्टाग्राम पोस्ट

“आजोबा…..
आता कोण बैलगाडी जुंपणार ? आता कोण माझे लाड करणार ? आता कोण माझ्यासोबत हरिपाठ घेणार ? अभंग म्हणणार ?
शिस्तप्रिय पण मनमिळावू स्वभाव… सगळ्या गावात रुबाब आणि धाक असायचा, येणाऱ्या प्रत्येकाची चेष्टा मस्करी करून बोलणं….तुकारामाची नात म्हणजे आपली येसूबाईंची भूमिका करणारी म्हणून पूर्ण गावात, तालुक्यात चर्चा….माझी नात म्हणून अभिमान बाळगणारे… शेवटपर्यंत स्वाभिमानानं , ताठ मानेनं जगलात…सगळं आयुष्य कष्टानं जगलात.”

“वारकरी संप्रदायात रमणारे, प्रत्येक सप्ताहात वीणा धरणारे, मला लहानपणापासून हरिपाठ , ज्ञानेश्वरी,गाथा आणि संपूर्ण भागवत संप्रदाय शिकवणारे लाडके आजोबा……
कितीही प्रयत्न केला तरी डोळ्यातील अश्रू काही थांबत नाहीत, पण हे नातं खूप अतूट होतं आणि कायम राहील…..
देवाच्या मनात काय आहे याचा कधीच कोणी अंदाज लावू शकत नाही, रात्री सिरीयल बघून एकत्र जेवण करून सकाळी आपण मॉर्निंग वॉकला जाऊ असं म्हणून सोडून गेलात आजोबा…..मन अगदी सुन्न झालंय……परत या आजोबा…..भावपूर्ण श्रद्धांजली”, अशी पोस्ट प्राजक्ता गायकवाडने केली आहे.

‘झुंड’ चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, दहा दिवसात कमावले इतके कोटी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत येसूबाईंच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री म्हणून प्राजक्ता गायकवाडला ओळखले जातं. तिची ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली होती. या भूमिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली. प्राजक्ताने काही कारणांमुळे ‘आई माझी काळुबाई या मालिकेतून काढता पाय घेतला. प्राजक्ता ही लवकरच ‘लॉकडाउन लग्न’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.