‘बाहुबली’ चित्रपटात शिवगामीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री रम्या कृष्णन यांचा आज वाढदिवस. त्यांनी दक्षिणात्य चित्रपटांमध्ये साकरलेल्या अनेक भूमिका गाजल्या. पण ‘बाहुबली’ने त्यांना वेगळी ओळख दिली. पण बॉलिवूडने त्यांना यश दिलं नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा : अभिनेत्री तेजस्वी प्रकाशचा ‘मन कस्तुरी रे’ चित्रपटातील फर्स्ट लूक प्रदर्शित

रम्या म्हणाल्या, “बाॅलिवूडमध्ये माझा कुठलाच चित्रपट फारसा यशस्वी झाला नाही. खरं तर मी तेलुगू चित्रपटांची स्टार होते. पण माझी दक्षिणात्य चित्रपटसृष्टी सोडून बाॅलिवूडमध्ये स्ट्रगल करण्याची हिंमत काही झाली नाही. मला सगळं सोडणं सोपं नव्हतं. तुम्हाला कुठल्याही फिल्म इंडस्ट्रीत काम करायचं असेल तर तुमच्याकडे यशस्वी चित्रपट हवा. माझ्याकडे हिंदी सिनेमा नव्हता. म्हणून मग तेलुगूमध्येच मी खूश होते.”

View this post on Instagram

A post shared by Ramya Krishnan (@meramyakrishnan)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वयाच्या १४ व्या वर्षी रम्या कृष्णन यांनी मनोरंजन सृष्टीत पदार्पण केले. वेल्लई मनासू हा त्यांचा पहिला चित्रपट. त्यानंतर त्यांनी ‘दयावान’, ‘परंपरा’, ‘खलनायक’, ‘चाहत’, ‘बनारसी बाबू’ आणि ‘बड़े मियां छोटे मियां’ या हिंदी चित्रपटातही काम केलं. या चित्रपटातील त्यांच्या कामाचं कौतुक झालं. पण तसं होऊनही त्यांना बाॅलिवूडमध्ये प्रमुख भूमिका साकारायला मिळाली नाही. नुकत्याच त्या विजय देवरकोंडा याच्या ‘लायगर’ चित्रपटात झळकल्या. पण हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला.

आणखी वाचा : ‘लायगर’ चित्रपटासाठी कलाकारांनी घेतले ‘इतके’ मानधन.. जाणून घ्या कोणी आकारले किती कोटी

दरम्यान, रम्या आता रजनीकांतबरोबर जेलर सिनेमात प्रमुख भूमिकेत असेल. ‘क्वीन’ वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्येही रम्या कृष्णन महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत.