मराठी आणि हिंदी चित्रपट, वेब सिरीज अशा विविध माध्यमातून काम करून स्वतःला सिद्ध करणारी अभिनेत्री म्हणजे श्रिया पिळगांवकर. आतापर्यंत ती मराठी, हिंदी चित्रपट, वेब सिरीज अशा विविध कलाकृतींमध्ये झळकली. मराठीपेक्षा जास्त काम तिने आतापर्यंत हिंदी मनोरंजन सृष्टीत केलं आहे. त्याबद्दल आता तिने भाष्य केलं आहे.

आणखी वाचा : सचिन व सुप्रिया पिळगावकर यांनी ‘असं’ केलं लेकीचं संगोपन, खुलासा करत श्रिया म्हणाली, “आई-बाबांनी कधीच…”

श्रियाने ‘एकुलती एक’ या मराठी चित्रपटातून मनोरंजन सृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटात तिने तिचे वडील अभिनेते सचिन पिळगांवकर यांच्याबरोबर स्क्रीन शेअर केला होता. पण हा चित्रपट केल्यानंतर ती मराठी चित्रपटांमध्ये दिसली नाही. ती हिंदी चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये झळकू लागली. त्यामुळे श्रेयाला मराठी सिनेसृष्टीत काम करायचं नाही असं अनेकांना वाटत होतं. आता यावर उत्तर देत श्रेयाने लोकांचा गैरसमज दूर केला आहे.

हेही वाचा : “आजच्या प्रेक्षकांना तुम्ही मूर्ख…” श्रिया पिळगावकरने ओटीटी माध्यमाबाबत मांडलं स्पष्ट मत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका मुलाखतीत ती म्हणाली, “मला मराठी चित्रपटांमध्ये काम करायचं नाही असा लोकांचा गैरसमज आहे. ‘एकुलती एक’ हा चित्रपट स्टारकिडला लॉन्च करणाऱ्या पठडीतला नव्हता. तर या चित्रपटानंतर लगेचच मी ‘फॅन’ चित्रपटात दिसले. त्यामुळे मला सारख्या हिंदी टच असलेल्या मराठी चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या. त्यामुळे मी थांबायचा निर्णय घेतला. ‘फॅन’नंतर मला दोन मराठी चित्रपटांची विचारणा झाली होती. त्यापैकी एकाचं पुढे काहीच झालं नाही आणि दुसऱ्याचा दिग्दर्शक बदलला. त्यामुळे मी मराठी चित्रपटात दिसले नाही.”