छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. दमदार अभिनयासह सौंदर्य आणि फिटनेससाठी तिला ओळखले जाते. ती अनेकदा तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. यानंतर आता श्वेताने एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळे अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. भोपाळमधील एका कार्यक्रमादरम्यान तिने ब्रा साईज आणि देव याबद्दल एक वादग्रस्त विधान केले आहे.

श्वेता तिवारी हिने काल बुधवारी (२६ जानेवारी) भोपाळमध्ये एका कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी तिने तिच्या आगामी वेब सीरिजची घोषणा केली. यादरम्यान आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत श्वेता तिवारी तिच्या संपूर्ण टीमसह उपस्थित होती. यावेळी भर पत्रकार परिषदेत स्टेजवर चर्चा सुरु असताना श्वेता तिवारीने एक वादग्रस्त विधान केले. यावेळी श्वेता तिवारी म्हणाली की, “माझ्या ब्रा चे माप देव घेत आहे”. तिचे हे विधान ऐकून सर्वजण थक्क झाले.

तिच्या या विधानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामुळे श्वेता तिवारी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. श्वेता तिवारी आणि रोहित रॉय यांच्यासोबत अनेक कलाकारांनी काल या कार्यक्रमाला हजेरी झाली. मात्र या कार्यक्रमात श्वेताने गमतीत केलेल्या त्या विधानामुळे तिला ट्रोल केले जात आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या चांगलाचा व्हायरल झाला आहे. तसेच अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करत राग व्यक्त करताना दिसत आहे.

दरम्यान यापूर्वीही अनेकदा श्वेता तिवारी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. ती तिच्या खासगी आयुष्यामुळे कायमच चर्चेत येत असते. दोन लग्न आणि घटस्फोटामुळे श्वेताचं खासगी आयुष्य चर्चेत राहिलं आहे. १९९८ सालामध्ये श्वेता तिवारीने अभिनेता राजा चौधरीसोबत लग्न केलं होतं. त्यांना पलक ही मुलगी आहे. तर २००७मध्ये श्वेता आणि राजा विभक्त झाले. राजा चौधरीवर श्वेता तिवारीने हिंसाचाराचा आरोप केला होता.

प्रियांका चोप्राला आई झाल्यानंतर अनुष्का शर्माने दिला प्रेमळ सल्ला, म्हणाली “आता रात्री…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर श्वेताने २०१३ सालामध्ये अभिनेता अभिनव कोहलीसोबत दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. श्वेता आणि अभिनवला रेयांश नावाचा मुलगा आहे. तर अभिनवदेखील हिंसाचार करत असून छळ करत असल्याचा आरोप श्वेताने केला होता. त्यानंतर २०१९ सालामध्ये श्वेताने अभिनवला घटस्फोट दिला.