अभिनेत्री सोनाली कुलकर्णी गेल्या बऱ्याच दिवसांपासून तिच्या हनिमून फोटोंमुळे चर्चेत आहे. करोनाकाळात तिला थाटामाटात लग्न करता आलं नाही. पण यंदा तिच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तिने पुन्हा पती कुणाल बेनोडेकरबरोबर लग्नगाठ बांधली. पारंपरिक पद्धतीने विवाहसोहळा पार पडल्यानंतर ती पुन्हा हनिमूनला देखील गेली. नवविवाहित जोडप्यासारखंच ती प्रत्येक क्षण जगत आहे. आता तिने सासरचा एक फोटो तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

सोनालीने सासरी पहिल्यांदाच स्वयंपाक बनवला आहे. तसा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर करत एक वेगळाच आनंद व्यक्त केला. सोनालीने फोटो शेअर करत म्हटलं आहे की, “सासरी केलेला पहिला पदार्थ, तांदळाची खीर”. सोनालीने सासरी पहिल्यांदाच गोड पदार्थ म्हणून तांदळाची खीर बनवली. कपाळाला कुंकू, हातात तांदळाच्या खीरने भरलेल्या वाट्या, गळ्यात लांब मंगळसुत्र आणि कुर्ता सोनालीने परिधान केलेला दिसत आहे.

आणखी वाचा – Photos : टी-सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्या पत्नीचा बोल्ड अंदाज, टॉपच्या अभिनेत्रीही पडतील फिक्या

एखाद्या साध्या गृहिणीप्रमाणे तिचा हा लूक आहे. सध्या सोनाली सासरी म्हणजेच लंडनला कुणालच्या राहत्या घरी हे सगळे आनंदाचे क्षण एण्जॉय करताना दिसत आहे. सासरी पहिल्यांदाच स्वयंपाक बनवल्याने तिचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. सोनालीने करोनाकाळात लग्न केल्याने कसलीच हौस-मौज तिला करता आली नाही. ते सगळेच क्षण आता ती जगत आहे.

आणखी वाचा – VIDEO : “मन्नतमध्ये ११ ते १२ टिव्ही अन् त्याची किंमत…”, शाहरुखचा ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकरीही झाले हैराण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोनालीने तिच्या पहिल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा लग्नाचा थाट घातला. तिचे आणि कुणालचे बरेच फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. तसेच सोनाली हनिमून दरम्यानचे फोटो देखील सोशल मीडियावर सतत शेअर करत होती. सोनालीने सासरी गेलेला फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर करताच नेटकऱ्यांनी तिच्या या पोस्टला पसंती दर्शवली आहे.