‘विठूमाऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची…’, करोना महामारीनंतर तब्बल २ वर्षांनी पांडुरंगाच्या पंढरीत पुन्हा एकदा हरीनामाचा गजर ऐकण्यास येऊ लागला आहे. सध्या महाराष्ट्रात पंढरीच्या वारीची सर्वत्र चर्चा आहे. हजारो कष्टकरी आपल्या शेतीची कामे बाजूला ठेऊन तन्मयतेने विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाच्या ओढीने दिंडीत सहभागी होताना दिसत आहेत. अनेक मराठी कलाकारही पंढरपूरच्या वारीत सहभागी होताना दिसत आहेत. नुकतंच अभिनेत्री आणि संवेदनशील कवयित्री स्पृहा जोशी ही वारीत सहभागी झाली आहे. यावेळी तिने तिचा अनुभव शेअर केला आहे.

स्पृहा ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच स्पृहाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत स्पृहा जोशीने वारीचा आणि पालखीचा अनुभव सांगितला आहे. तसेच वारीत सहभागी होणाऱ्या लोकांशी तिने गप्पाही मारल्या. त्यांचे अनुभव ऐकले. हा सगळा सुखद अनुभव स्पृहाने व्यक्त केला आहे.

अभिनेत्री स्पृहा जोशीने सांगितला लग्नापूर्वीचा किस्सा, म्हणाली “आम्हाला जबरदस्ती एका…”

“आयुष्यात पहिल्यांदाच वारीचं, पालखीचं वातावरण अनुभवायची संधी मिळाली.. पूर्ण वेळ मी आसपासचे हरीभक्तीत लीन झालेले चेहरे नुसती बघत राहिले होते.. ओढ, समर्पण, असोशी, तळमळ.. सगळे कागदावरचे शब्द.. काल त्या शब्दांची माणसं होताना पाहिली.. पांडुरंग हरी, असे स्पृहाने हा व्हिडीओ शेअर करताना म्हटले आहे.

स्पृहाने शेअर केलेला व्हिडीओ हा सध्या चर्चेत आहे. तसेच तिच्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करताना दिसत आहेत. भक्तिमय अनुभुती …छानच, जय हरी विठ्ठल, अशा अनेक कमेंट पाहायला मिळत आहेत.

Video : “फुलावर फिरत असतो भुंगा…”, पाठकबाईंनी राणादासाठी घेतला खास उखाणा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या स्पृहा ही सूर नवा ध्यास नवा या रिअॅलिटी शोच्या नव्या पर्वात पुन्हा एकदा निवेदकाच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या या कार्यक्रमासाठी ऑडिशन सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. लवकरच कलर्स मराठीवर प्रेक्षकांना हा कार्यक्रम पाहता येणार आहे. या पर्वातही गायक महेश काळे आणि अवधूत गुप्ते परीक्षक म्हणून आपल्याला दिसणार आहेत.