अभिनेत्री तब्बू आणि अजय देवणनची जोडी रुपेरी पडद्यावर सुपरहिट ठरली. नव्वदच्या दशकामध्ये या जोडीने काही सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले. फक्त चित्रपटांसाठीच तब्बू-अजयची मैत्री नव्हती. हे दोघं खऱ्या आयुष्यातही उत्तम मित्र-मैत्रिणी आहेत. कोणत्या ना कोणत्या मुलाखतींमधून तब्बू-अजयची मैत्री किती घट्ट आहे हे दिसून येतं. तब्बूने अजूनही लग्न केलेलं नाही. पण तिचं लग्न अजूनही झालं नाही याला कारणीभूत अजय आहे असं तब्बूचं म्हणणं आहे.

आणखी वाचा – Photos : मालदीवमध्ये पोहोचल्या ‘आई कुठे काय करते’मधील कांचन आजी, नवऱ्यासोबत शेअर केले फोटो

मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीमध्ये तब्बूने म्हटलं की, “माझ्या वाढत्या वयामध्ये अजय माझा सगळ्यात जवळच्या मित्रांपैकी एक होता. माझा चुलत भाऊ समीर आर्य याच्या शेजारी अजय राहत होता. समीर-अजय यांच्या मैत्रीमुळे माझी आणि अजयची ओळख झाली. समीर-अजय तेव्हा माझ्या मागे मागे यायचे. माझ्या मागे कोणी मुलगा दिसला तरी त्याला धमकी द्यायचे. आज मी अजयमुळेच एकटी आहे.”

पुढे बोलताना तब्बू म्हणाली, “जर कोणावर मी विश्वास ठेवू शकते तर तो अजयच आहे. अजय एखाद्या लहान मुलासारखा आहे. आपल्या जवळच्या लोकांची तो उत्तम पद्धतीने काळजी घेतो. जेव्हा तो सेटवर असतो तेव्हा देखील सेटवरील वातावरण अगदी चांगलं असतं. आमच्या दोघांचं नातं अगदी वेगळं आहे.” तब्बूच्या बोलण्यामधून अजय आणि तिची घट्ट मैत्री स्पष्टपणे दिसून येते.

आणखी वाचा – Photos : हृतिक रोशनच्या ६७ वर्षीय फिटनेस प्रेमी आईला पाहिलंत का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याआधीही तब्बूने एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की, “माझ्यासाठी काय चांगलं आणि काय वाईट आहे हे अजयला माहित आहे.” ‘विजयपथ’, ‘दृश्यम’, ‘तक्षक’, ‘हकीकत’, ‘गोलमाल अगेन’, ‘और दे दे प्यार दे’ अशा अनेक चित्रपटांमध्ये दोघांनी एकत्र काम केलं आहे. आता ‘दृश्यम २’ चित्रपटामध्येही दोघं एकत्र काम करताना दिसणार आहेत.