Zareen Khan Gives Reason Of Rejecting Bigg Boss : बॉलीवूड अभिनेत्री झरीन खान सलमान खानबरोबर ‘वीर’ चित्रपटात दिसली होती. झरीन खान बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. तरीही अभिनेत्री तिच्या लव्ह लाइफ आणि तिच्या लाइफस्टाईलमुळे चर्चेत असते.

अलीकडेच अभिनेत्रीने सलमान खानच्या ‘बिग बॉस’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये न जाण्याबाबत मौन सोडले. तिला या शोसाठी बऱ्याच काळापासून ऑफर येत आहेत. तिने या शोमध्ये सामील होण्याची ऑफर का नाकारली ते सांगितले आहे. अभिनेत्री काय म्हणाली ते जाणून घेऊया.

‘बिग बॉस’बद्दल झरीन खानचे काय मत?

अभिनेत्री झरीन खानने ‘हिंदी रश’ला दिलेल्या मुलाखतीत ‘बिग बॉस’बद्दल सांगितले, “मला तो शो खूप आवडतो. मी कदाचित यादरम्यान फक्त दोन-तीन सीझन चुकवले असतील; पण मी तो पाहते.” पुढे तिने शो नाकारण्याबद्दल सांगितले, “सर्वप्रथम माझ्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे मी तीन महिने वेगळे कुठेतरी राहण्याचा विचारही करू शकत नाही. मला वाटत नाही की, माझे घर माझ्याशिवाय चालेल. मी आर्थिक बाबींबद्दल बोलत नाही. मला १० हजार गोष्टींची काळजी घ्यावी लागते. जर मी एक दिवसही बाहेर गेले, तर मी माझ्या आईला पाच-सात वेळा फोन करते आणि तिच्या तब्येत व इतर गोष्टींबद्दल विचारते. तर, हा पहिला घटक आहे.”

पुढे संभाषणादरम्यान झरीन खान म्हणाली, “दुसरे म्हणजे मला वाटत नाही की, मी अशा घरात राहू शकेन, जिथे मी इतक्या लोकांना ओळखत नाही. मी मित्र बनविण्यासाठी वेळ काढत नाही; पण मला माहीत नाही की, मी किती आरामदायी असेन. त्याशिवाय एक मोठे कारण म्हणजे मी वाईट बोलणे सहन करू शकत नाही. मी गैरवर्तन सहन करू शकणार नाही. मी कोणावर तरी हात उचलेन. नंतर मला बाहेर फेकले जाईल. म्हणून मी न जाणे चांगले.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिनेत्री झरीन खानने २०१० मध्ये बॉलीवूडमध्ये प्रवेश केला. तिचा पहिला चित्रपट ‘वीर’ होता, ज्यामध्ये ती अभिनेता सलमान खानबरोबर दिसली. हा चित्रपट अपेक्षेप्रमाणे चालला नाही. त्याशिवाय तिने ‘रेडी’, ‘अक्सर २’, ‘हेट स्टोरी ३’ व ‘हाऊसफुल २’सारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे. ही अभिनेत्री सध्या काही प्रादेशिक चित्रपटांमध्ये काम करीत आहे. तिने ‘डाका’ व ‘जट्ट जेम्स बाँड’ यांसह काही पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे.