‘दिल्ली ६’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री अदिती राव हैदरी सध्या हिंदी चित्रपटांत फारशी दिसत नाही. २०१८ मध्ये ‘दासदेव’ या चित्रपटानंतर तिने पूर्णपणे दाक्षिणात्य चित्रपटांची वाट धरली. एका कार्यक्रमात तिने स्वत:विषयी कधीच गुगल सर्च करत नसल्याचा खुलासा केला. यामागचं कारणसुद्धा तिने सांगितलं.
‘एकदा गुगलवर माझ्या नावाने सर्च केला असता असे काही फोटो दिसले की तेव्हापासून मी स्वत:विषयी सर्च करणं बंद केलं,’ असं अदितीने सांगितलं. अदितीने ‘ये साली जिंदगी’ या चित्रपटात भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी तिने बॅकलेस फोटोशूट केलं होतं. गुगलवर नाव टाकल्यावर हेच बॅकलेस फोटो पाहायला मिळतात असं तिचं म्हणणं आहे. हे पाहून तिने स्वत:विषयी गुगल सर्च कधीच न करण्याचा निर्णय घेतला.
View this post on Instagram
अदितीने आतापर्यंत ‘ये साली जिंदगी’, ‘भूमी’, ‘रॉकस्टार’, ‘मर्डर ३’, ‘दिल्ली ६’ आणि ‘दासदेव’ या हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे. तिच्या दाक्षिणात्य चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने ती बॉलिवूडपेक्षा दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करण्यास प्राधान्य देत आहे.