सुप्रसिद्ध गायक, अभिनेता आणि रिअ‍ॅलिटी शो होस्ट आदित्य नारायण हा कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत येतच असतो. आदित्य नारायण त्याच्या सोशल मीडियावर देखील बराच सक्रिय असतो. नेहमीच ठराविक कालावधीच्या अंतराने सोशल मीडिया अकाउंट्सवर पोस्ट शेअर करत असतो. आदित्य नारायणचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. यात त्याची एक मुलाखत सुरू असल्याचं दिसून येतंय. या मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नांवर निरागस भावनेने उत्तरे देताना दिसून येतोय.

आदित्य नारायणचा हा व्हिडीओ त्यावेळचा आहे, ज्यावेळी तो केवळ आठ वर्षाचा होता. आठ वर्षाचा आदित्य नारायण या व्हिडीओमध्ये त्याने पाहिलेल्या स्वप्नांच्या बाबतीत बोलताना दिसून येतोय. या व्हिडीओमध्ये आदित्य नारायण म्हणतोय, “हे तर काहीच नाही…अजुन मला खूप मोठा गायक बनायचंय आणि खूप उंच शिखर गाठायचंय…आतापर्यंत यातलं केवळ ५ टक्केच मिळवलंय.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sudarshan (@notwhyral)

दुसऱ्या आणखी एका व्हिडीओमध्ये त्याला विचारलं जातं की तुला घरी कुणाचा ओरडा पडत नाही का ? यावर तितक्याच निरागस भावनेने तो उत्तर देतो, “हो, ओरडा पडलाच पाहीजे जर काही चूक झाली तर..”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sudarshan (@notwhyral)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आदित्य नारायणच्या लहानपणीचा हा व्हिडीओ त्याच्या चाहत्यांना खूपच आवडलाय. आदित्य नारायणने एक बालकलाकाराच्या माध्यमातून त्याच्या करिअरची सुरुवात केली होती. करिअरच्या सुरवातीला त्याने अभिनेता शाहरूख खानच्या ‘परदेश’ चित्रपटात काम केलं होतं. त्यानंतर अभिनेता सलमान खानच्या ‘जब प्यार किसी से होता है’ चित्रपटातून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. आदित्यने बाल गायक म्हणून जवळपास १०० पेक्षा अधिक गाणे गायले आहेत. यासाठी त्याला ‘सर्वश्रेष्ठ बाल गायक’ पुरस्काराने गौरवण्यात देखील आलं. याशिवाय त्याने ‘शापित’ चित्रपटातून मुख्य भूमिका साकारण्यास सुरवात केली. सध्या तो ‘इंडियन आयडल १२’ या शोचं सुत्रसंचालन करतोय.