अटक वॉरंटचा इशारा मिळताच अखेर कंगना रणौत न्यायालयात हजर

मानहानी प्रकरणी पुढील सुनावणीस गैरहजर राहिल्यास अटक वॉरंट बजावण्यात येईल, असा इशारा अंधेरी न्यायालयाने कंगनाला दिला होता.

kangana-ranaut
(File Photo)

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला मानहानी प्रकरणी पुढील सुनावणीस गैरहजर राहिल्यास अटक वॉरंट बजावण्यात येईल, असा इशारा अंधेरी न्यायालयाने दिला होता. यानंतर अखेर कंगना रणौत सुनावणीसाठी न्यायालयात हजर झाली आहे. १४ सप्टेंबरला पार पडलेल्या सुनावणीत कंगनाला . करोनाची चाचणी करता यावी यासाठी तिला मंगळवारच्या सुनावणीला गैरहजर राहण्याची मुभा देण्याची विनंती कंगनाच्या वतीने न्यायालयाला करण्यात आली होती.

कंगना गेल्या काही आठवड्यांपासून चित्रीकरणात व्यग्र होती. शिवाय तिला करोनाची लक्षणे आहेत. कंगनाचा चाचणी अहवाल सकारात्मक आल्यास सुनावणीसाठी गैरहजर राहण्याची मुभा पुन्हा एकदा मागितली जाईल. त्यावेळी तिचा वैद्यकीय अहवालही सादर केला जाईल, असा दावाही कंगनाच्या वतीने करण्यात आला.

परंतु कंगनाच्या मागणीला अख्तर यांच्यातर्फे विरोध करण्यात आला. तसेच आतापर्यंत कंगना एकाही सुनावणीला हजर झालेली नाही. या उलट आपण प्रत्येक सुनावणीला हजर राहात आहोत. त्यामुळे सतत गैरहजर राहणाऱ्या कंगनाविरोधात अटक वॉरंट बजावण्याची मागणी अख्तर यांच्या वतीने करण्यात आली. या प्रकरणी सुरू केलेल्या कारवाईला आव्हान देणारी कंगनाची याचिका उच्च न्यायालयानेही रद्द केल्याकडे अख्तर यांच्या वकिलाने न्यायालयाचे लक्ष वेधले. न्यायालयाने कंगनाची मंगळवारच्या सुनावणीला गैरहजर राहण्याची मागणी मान्य केली. त्याच वेळी कंगना पुढील सुनावणीच्या वेळी गैरहजर राहिली तर तिच्याविरोधात अटक वॉरंट बजावण्यात येईल, असा इशाराही न्यायालयाने दिला होता. न्यायालयाच्या इशाऱ्यानंतर अखेर कंगनाने २० सप्टेंबरच्या सुनावणीसाठी न्यायालयात हजेरी लावली.

न्यायालय पक्षपाती असल्याचा आरोप करत कंगना रणौतने दुसऱ्या न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.  या प्रकरणी पुढील सुनावणी १५ नोव्हेंबरला होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: After court warns issuing arrest warrant kangana ranaut appears before andheri metropolitan magistrate kpw

ताज्या बातम्या