हंसल मेहताच्या ‘कॅप्टन इंडिया’वर ‘ऑपरेशन यमन’च्या निर्मात्याने केला चोरीचा आरोप

‘स्कॅम १९२’,’द बिग बुल’ नंतर आता ‘कॅप्टन इंडिया’च्या बाबत पुनरावृत्ती होणार का?

kartik_aaryan
Photo-Loksatta file

अभिनेता कार्तिक आर्यनचा आगामी चित्रपट ‘कॅप्टन इंडिया’ने सध्या प्रेक्षकांच लक्ष वेधून घतलं आहे. त्याच्या फॅन्सना त्याचा हा अनोखा अंदाज प्रचंड आवडला आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या पोस्टरला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. मात्र कार्तिकचा हा चित्रपटा सध्या चुकीच्या करणासाठी चर्चेत आहे. हंसल मेहता दिग्दर्शित ‘कॅप्टन इंडिया’या अॅक्शन ड्रामावर प्लेजरीझमचा म्हणजे चोरीचा आरोप असल्याची बातमी समोर आली आहे.

कार्तिक आर्यनच्या ‘कॅप्टन इंडिया’ या चित्रपटावर निर्माते सुभाष काळे यांनी चित्रपटाची कथा चोरली असल्याचा आरोप लावला आहे. त्यांचा असा दावा आहे की ‘कॅप्टन इंडिया’ आणि ‘ऑपरेशन यमन’या दोन्ही कथेत साधर्म्य आहे. ‘ऑपरेशन यमन’ ही कथा यमन शहरावर आलेल्या संकटावर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. २०१५ मधील ऑपरेशन राहतच्या दरम्यान वी.के सिंह, या भारतीय आर्मी ऑफिसरनी यमन येथील भारतीय व परप्रांतीय लोकांचा जीव वाचवला होता. ‘कॅप्टन इंडिया’ या चित्रपटाच्या पोस्टरकडे पाहून अशी काहीच हिंट मिळत नाही. मात्र ‘ऑपरेशन यमन’च्या निर्मात्यांचा असा दावा आहे की ‘कॅप्टन इंडिया’ या चित्रपटाच्या पोस्टरवरून हे स्पष्ट पणे कळतं आहे की, दोघांची कथा एकाचं घटनेवरून प्रेरित झाली आहे.

‘ऑपरेशन यमन’चे निर्माते सुभाष काळे यांनी ‘बॉलीवूड हंगामा’शी बोलताना सांगितले की, “ही कन्सेप्ट त्यांच्या बाजूने लीक झालेली नाही………यमनची राजधानी साना शहर आहे. ‘कॅप्टन इंडिया’च्या पोस्टरवर जे दिसत आहे, ते आमच्या पोस्टरवर पण आहे. त्यांच्या पोस्टरमधील आर्किटेक्चर आणि लँडस्केप असे आहे की ते जगातील इतर कोणत्याही शहरांशी जुळत नाही. पोस्टरमध्ये शहरावर कार्पेट-बॉम्बिंग होत आहे, सना या शहरावरून जाणारे एक विमान आणि ‘कॅप्टन इंडिया’ हे शीर्षक या वरुन असे स्पष्ट कळतं की यांचा चित्रपट त्याचं  घटनेवर आधारित आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

सुभाष काळे या पुढे म्हणतात की , “अक्षय कुमार, परेश रावल, यांना त्यांनी चित्रपटा साठी विचारले आहे. दोघांनाही कथा आवडली असून मुख्य भूमिका कोण करणार हे लवकरच ठरवू.” घडलेल्या घटने बद्दल हंसल मेहता यांच्या मित्राने सांगितले की, “जरी स्क्रिप्ट सेम नसली तरी घटना सेम असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते ‘कॅप्टन इंडिया’वर स्टे आणतील.” यापूर्वी देखील हंसल मेहतांच्या सीनेमाच्या कथेचे साधर्म्य इतरा सीनेमाच्या कथेशी झाले होते. हंसल मेहता दिग्दर्शित ‘कॅप्टन इंडिया’या चित्रपटात कार्तिक आर्यन पायलटची भूमिका साकारताना दिसेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: After sacm 1992 once again hansal meheta film captain india got accused for plagiarism aad