सध्या बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. ते दोघे उद्या लग्न करणार आहेत असे म्हटले जाते. त्यात आत अभिनेत्री श्रद्धा कपूर लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याचे म्हटले जाते. श्रद्धा ही फोटोग्राफर रोहन श्रेष्ठसोबत गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जाते. गेल्या काही वर्षांपासून ते दोघे लग्न बंधनात अडकणार असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, आता श्रद्धाची मावशी आणि अभिनेत्री पद्मीनी कोल्हापूरे यांनी त्या दोघांच्या लग्नाचे संकेत दिले आहेत.

पद्मीनी यांनी त्यांच्या ये गलियाँ ये चौबारा या गाण्याचं एक रिक्रिएटेड व्हर्जन शेअर केलं आहे. हे गाणं त्यांनीच गायल आहे. हे गाणं श्रद्धाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. श्रद्धाच्या या पोस्टवर कमेंट करत पद्मीनी म्हणाल्या, तुझ्या आणि वेदिकाच्या लग्नात मी गाणार आहे. पद्मीनी यांची ही कमेंट पाहिल्यानंतर श्रद्धा लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

आणखी वाचा : ‘खायला पैसे नव्हते, अक्षरश: बिग बींनी घरात काम करणाऱ्यांकडून पैसे…’, अभिषेकने केला खुलासा

आणखी वाचा : कृष्णा अभिषेकने असे काय केले की राणी मुखर्जीच्या डोळ्यातून आले अश्रू थांबवावे लागले शुटिंग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या गाण्या विषयी बॉलिवूड लाइफशी बोलताना पद्मीनी म्हणाल्या, हे गाणं शूट केल्यापासून ते माझ्या हृदयाच्या जवळ आहे आणि मला हे गाणं माझ्या मुलीच्या लग्नात गायचं आहे. माझ्यासाठी श्रद्धा आणि वेदिका या माझ्या मुलींसारख्या आहेत. मला हे गाणं माझ्या मुलाच्या लग्नात गायचं होतं पण तेव्हा हे गाणं प्रदर्शित झालं नव्हतं म्हणून मला गाता आलं नाही. ये गलियाँ ये चौबारा हे गाणं माझ्या हृदयाच्या जवळ असल्यामुळे मला त्या गाण्यावर पुन्हा एकदा थिरकायचे असून आई आणि मुलीमधील असलेले नाते जगा समोर आणायचे आहे.