छोट्या पडद्यावरील द कपिल शर्मा शो हा लोकप्रिय कॉमेडी शो आहे. या शोमध्ये अनेक सेलिब्रिटी त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावताना दिसतात. तर यावेळी राणी मुखर्जी आणि सैफ अली खान आणि शर्वरीने द कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी कृष्णाने असे काही केले की राणीच्या डोळ्यातून अश्रू आले. एवढचं काय तर शुटिंग देखील थांबवावे लागले. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.

हा व्हिडीओ अर्चना पुरन सिंगने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ प्रमोशनच्या वेळीचा आहे. या व्हिडीओत कृष्णा हा अमिताभ यांची नक्कल करतना दिसत आहे. कृष्णा असा विनोद करतो की हसून हसून राणीच्या डोळ्यातून पाणी आले. शुटिंग थांबवण्यात येते आणि राणी टचअप करू लागते. त्यानंतर शूटिंग संपते आणि निघत असताना राणी कृष्णाची स्तूती करते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा : ‘खायला पैसे नव्हते, अक्षरश: बिग बींनी घरात काम करणाऱ्यांकडून पैसे…’, अभिषेकने केला खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राणी मुखर्जीसोबत या चित्रपटात सैफ अली खान, शर्वरी आणि सिद्धार्थ चतुर्वेदी हे चौघे ‘बंटी और बबली २’ या चित्रपटात एकत्र दिसले. हा चित्रपट १९ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट ‘बंटी और बबली’ या चित्रपटाचा दुसरा पार्ट आहे.