अभिजित आसावरीच्या दिमाखदार लग्न सोहळ्यानंतर आता ते दोघे राजस्थान-उदयपूरला फिरायला गेले आहेत. आसावरीचं जरी अभिजीतसोबत लग्न झालं असलं तरी तिचं सर्व लक्ष आजोबा, सोहम आणि शुभ्राकडे लागून राहिलेलं आहे. अभिजीत आणि आसावरीचं लग्न सोहमला मात्र पटलेलं नाही आहे आणि तो त्यांना कसं वेगळं करता येईल याच्या योजना आखतोय. त्या दिशेने सोहमने पहिलं पाऊल देखील उचललं आहे. अभिजीत आणि आसावरी या दोघांना एकमेकांपासून दूर ठेवण्यासाठी सोहम शुभ्राला घेऊन राजस्थान-उदयपूरला गेला आहे. एकीकडे अभिजीत राजे आसावरीसोबत राजस्थानची ट्रिप अविस्मरणीय बनवण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत तर दुसरीकडे सोहम त्या दोघांना एकत्र वेळ व्यतीत करायला मिळू नये म्हणून धडपड करतोय.
आणखी वाचा : रोहिणी हट्टंगडी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर; ‘या’ मालिकेत साकारणार भूमिका
सोहम राजस्थानला पोहोचला तर आहे आता तो या दोघांना वेगळं करण्यासाठी काय करेल आणि त्यात तो यशस्वी ठरेल का हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.