आराध्याच्या वाढदिवसासाठी ऐश्वर्याची जोरदार तयारी

बॉलीवूडची यमी ममी ऐश्वर्या राय बच्चनने शनिवारी १ नोव्हेंबरला ४१वा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर आता तिच्या लाडक्या लेकीचा म्हणजेच आराध्याचा वाढदिवस जवळ येत आहे.

बॉलीवूडची यमी ममी ऐश्वर्या राय बच्चनने शनिवारी १ नोव्हेंबरला ४१वा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर आता तिच्या लाडक्या लेकीचा म्हणजेच आराध्याचा वाढदिवस जवळ येत आहे. १६ नोव्हेंबरला आराध्या तीन वर्षांची होणार आहे.
ऐश्वर्याला मुलाखतीत आराध्याच्या वाढदिवसाबद्दल विचारले असता ती म्हणाली, हो मी आराध्याच्या वाढदिवसासाठी खास तयारी करत आहे. तिच्या पहिल्या वाढदिवसाला कुटुंबातील जवळच्या व्यक्तींना बोलविण्यात आले होते. दुसरा वाढदिवस आम्ही अगदी थाटामाटात लहान मुलांसोबत साजरा केला. यावर्षी ती तीन वर्षांची होत आहे आणि हा वाढदिवस तिच्या पहिल्या दोन वाढदिवसांच्या सेलिब्रेशनचे मिश्रण असेल.
तुझा वाढदिवस आहे हे आराध्याला कळले होते का? असे विचारले असता ती म्हणाली, हो, आपल्या आईचा आज वाढदिवस आहे इतके तिला कळलेले. गेल्यावर्षी तिने तिच्या बोबड्या स्वरात मला शुभेच्छा दिल्या होत्या. यावर्षीही तिने मला शुभेच्छा दिल्या आणि तिचाही वाढदिवस आता जवळ येत आहे हे तिला समजते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Aishwarya rai bachchan has plans for daughter aaradhyas birthday in november

ताज्या बातम्या