scorecardresearch

VIDEO : लेकीला कॅमेऱ्यासमोर पोझ देताना पाहून भारावली ऐश्वर्या, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई विमानतळावर कॅमेऱ्यासमोर ऐश्वर्या राय बच्चनची लेक आराध्या पोझ देतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

aishwarya rai spotted at airport, aishwarya rai leaves for cannes with daughter
मुंबई विमानतळावर कॅमेऱ्यासमोर ऐश्वर्या राय बच्चनची लेक आराध्य पोझ देतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असणारं कुटुंब म्हणजे बच्चन कुटुंब. अमिताभ बच्चन यांच्यापासून ते अगदी त्यांची नात आराध्या बच्चनपर्यंत वेगवेगळ्या चर्चा बी-टाऊनमध्ये रंगतात. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनची लेक आराध्या बऱ्याचदा कॅमेऱ्यापासून लांब पळताना दिसते. पण यावेळी तिने चक्क कॅमेऱ्यासमोर पोझ दिल्या. आणि आराध्याचा हा नवा अवतार पाहून ऐश्वर्या मात्र तिच्याकडे एकटक पाहत राहिली. यादरम्यानचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अभिषेक, ऐश्वर्या लेकीसह कान्स चित्रपट महोत्सवासाठी रवाना झाले आहेत. यादरम्यान मुंबई विमानतळावर पापाराझी छायाचित्रकारांनी त्यांना घेरलं. यावेळी आराध्याला फोटोसाठी पोझ देताना पाहून ऐश्वर्याच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणीत झाला होता. आराध्या फोटोंसाठी पोझ देण्यात खूप मग्न झाली होती. खरं तर पहिल्यांदाच आराध्याला कॅमेऱ्यासमोर मनमोकळेपणाने वावरताना सगळ्यांनी पाहिलं असावं.

आणखी वाचा – Photos : पुन्हा एकदा बोल्ड फोटो शेअर करत आयरा खानने ट्रोलर्सला दिलं उत्तर, म्हणाली, “मला ट्रोल करणाऱ्यांसाठीच…”

यावेळी ऐश्वर्याने काळ्या रंगाचं टी-शर्ट, जॅकेट, पँट परिधान केली होती. तर आराध्याने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला होता. माय-लेकीची जोडी अगदी साध्या लूकमध्येही उठून दिसत होती. त्यांच्या या व्हायरल व्हिडीओला हजारो जणांनी कमेंट्स केल्या आहेत. तसेच व्हिडीओला पसंती देखील दर्शवली आहे.

आणखी वाचा – Photos : माधुरी दीक्षित-डॉक्टर श्रीराम नेने यांचे रोमँटिक फोटो पाहिलेत का?, बायकोसाठी शेअर केली खास पोस्ट

कान्स चित्रपट महोत्सवाच्या रेड कार्पेटवर आता ऐश्वर्याचा नवा लूक पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबरीने दीपिका पदुकोण, पूजा हेगडे, अदिती राव हैदरी यांसारख्या अभिनेत्री देखील कान्स चित्रपट महोत्सवाला हजेरी लावणार आहेत. यामध्ये दाक्षिणात्य कलाकारांचा देखील समावेश आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aishwarya rai bachchan leaves for cannes 2022 abhishek aaradhya mumbai airport video viral on social media kmd

ताज्या बातम्या