ऐश्वर्या राय बच्चन सध्या ‘पोन्नियन सेल्वन’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. काही वर्षानंतर ऐश्वर्या पुन्हा एकदा चित्रपटाद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. या चित्रपटामधील तिच्या लूकची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. पण त्याचबरोबरीने ऐश्वर्या एका वेगळ्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. ती दुसऱ्यांदा गरोदर असल्याचं बोललं जात आहे. ऐश्वर्याचा एक व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला. यामुळेच ती गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

आणखी वाचा – …अन् करीना कपूरने बिपाशा बासूच्या कानाखाली मारली, तेव्हा नेमकं काय घडलं होतं?

ऐश्वर्या राय बच्चन दुसऱ्यांदा आई होणार?
ऐश्वर्या कामानिमित्त मुबंईबाहेर जात होती. यादरम्यान मुंबई विमानताळावर पापाराझी छायाचित्रकारांनी तिला घेरलं. विमानतळावरील तिचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्याने सैल कपडे परिधान केले असल्याचं दिसत आहे. पांढऱ्या रंगाचं सैल लाँग जॅकेट तिने परिधान केलं होतं.

पाहा व्हिडीओ

तिची ड्रेसिंग स्टाइल पाहून नेटकऱ्यांनी ऐश्वर्या पुन्हा गरोदर आहे, तू गरोदर आहेस का? अशा विविध कमेंट केल्या आहेत. ऐश्वर्याच्या ओव्हरसाइज कपड्यांमुळे ती गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. पण ती खरंच दुसऱ्यांदा आई होणार का? याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे. तसेच ऐश्वर्याने स्वतःही याबाबत कोणताच खुलासा केलेला नाही.

आणखी वाचा – Video : नवऱ्याने मिठी मारली, किस केलं अन्…; डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमामध्येच रडू लागली बिपाशा बासू, व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऐश्वर्याने काही वर्षांपूर्वीच एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिची मुलगी आराध्या नेहमीच तिच्याबरोबर असल्याचं अनेक व्हायरल व्हिडीओ, फोटोंमध्ये दिसून आलं आहे. सध्या ऐश्वर्या ‘पोन्नियन सेल्वन’ या चित्रपटावरच लक्ष केंद्रित करत आहे.