दमदार अभिनय आणि मनमोहक सौंदर्य यामुळे कायम चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणून ऐश्वर्या राय बच्चनला ओळखले जाते. तिने चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. सध्या ती मणिरत्नम यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन पार्ट १’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. येत्या ३० सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाद्वारे ऐश्वर्या ही तब्बल ४ वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. ऐश्वर्याच्या आगामी ‘पोन्नियिन सेल्वन पार्ट १’ तिची मुलगी आराध्याने एक खास रोल केला आहे. नुकतंच ऐश्वर्याने तिच्या मुलाखतीत याबद्दलचा खुलासा केला.

मणिरत्नम यांनी दिग्दर्शित केलेला ‘पोन्नियन सेल्वन १’ या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन ही दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात ती राणी नंदिनी ही भूमिका साकारत आहे. ती पझुवूरची राजकुमारी आहे. तसेच ती मंदाकिनी देवीच्या भूमिकेतही दिसणार आहे. या चित्रपटात चियान विक्रम आदित्य करिकलनच्या भूमिकेत आहे. नुकतंच एका वृत्तवाहिनीशी बोलताना तिने तिची भूमिका आणि तिच्या लेकीची प्रतिक्रिया याबद्दल भाष्य केले.
आणखी वाचा : अनुष्का शर्माने न आवडलेले फोटो केले शेअर, एक्स बॉयफ्रेंड कमेंट करत म्हणाला…

‘न्यूज १८’ शी बोलताना ऐश्वर्या म्हणाली, “मी जेव्हा माझ्या भूमिकेबद्दल आराध्याला सांगितले तेव्हा ती फारच खूश झाली. तिला पीरियड ड्रामा पाहायला आवडतो. तिला सेटवर येण्याचीही संधी मिळाली. तिथे मला पाहून तिला खूप आनंद झाला. सेटवर आल्यानंतर तिच्या डोळ्यात तो आनंद स्पष्ट दिसत होता. आराध्याला मणिरत्नम यांच्याबद्दल फार आदर आहे. ते तिला फार आवडतात. या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान जेव्हा आराध्याला सेटवर येण्याची संधी मिळाली तेव्हा तिला फार आनंद झाला. इतकंच नव्हे तर त्यावेळी मणिरत्नम यांनी तिला एका सीनच्या सुरुवातीला अॅक्शन म्हणण्याची संधीही दिली. त्यामुळे तिच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.”

आणखी वाचा : पनामा पेपर लीक प्रकरणात ईडीच्या चौकशीनंतर ऐश्वर्या रायची पहिली पोस्ट, फोटो शेअर करत म्हणाली…

“ती आनंदाच्या भरात फार वेडी झाली होती. ती मला येऊन म्हणाली मला सरांनी अॅक्शन बोलण्याची संधी दिली आहे. सुरुवातीला तिला याबाबत आश्चर्य वाटले आणि आम्हीही हे ऐकून फार थक्क झालो. त्यावेळी आम्ही तिला सांगितलं की आजपर्यंत आम्हाला कोणीही अशी संधी दिलेली नाही. मणिरत्नम सरांनी आराध्याला दिलेली संधी तिच्यासाठी अमूल्य आहे. मला खात्री आहे की ती जेव्हा मोठी होईल तेव्हा तिच्यासाठी ही एक महत्त्वपूर्ण आठवण असेल”, असे ऐश्वर्याने म्हटले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ऐश्वर्याप्रमाणेच आराध्याचेही खूप चाहते आहेत. आराध्याचे फोटो आणि व्हिडीओ काही मिनिटांतच सोशल मीडियावर व्हायरल होतात. ‘पोनियान सेल्वन-1’मध्ये त्रिशा कृष्णन, विक्रम आणि शोभिता धुलिपाला यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट चोल साम्राज्याच्या महाकथेवर आधारित असून तो दोन भागात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा १९५० ते १९५४ दरम्यान कल्की कृष्णमूर्ती यांनी लिहिलेल्या ‘पोनियान सेल्वन’ नावाच्या तमिळ पुस्तकावर आधारित आहे.