बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा २०१४ मध्ये प्रदर्शित झालेला ‘दृश्यम’ चित्रपट चांगलाच हिट झाला होता. या चित्रपटाने प्रेक्षकांवर वेगळीच छाप पाडली होती. सस्पेन्स थ्रिलर असलेल्या या चित्रपटातील अजय देवगणचा अंदाज प्रेक्षकांना खूपच आवडला होता. लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अलिकडेच अजयने शेअर केलेल्या एका पोस्टनंतर या चित्रपटाची चर्चा सुरू झाली होती. आता या चित्रपटाचा उत्कंठावर्धक टीझर प्रदर्शित झाला आहे.

आणखी वाचा : “‘RRR’ हा ऑस्कर मटेरियल चित्रपट…”, दिग्दर्शक गौतम मेनन यांनी व्यक्त केली शंका

१ मिनिट २२ सेकंदाच्या या टीझरने प्रेक्षकांची या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. ‘दृश्यम २’ च्या टीझरमध्ये एकीकडे चित्रपटाच्या पहिल्या भागाबद्दल माहिती दिली आहे तर दुसरीकडे टीझरच्या शेवटी फक्त अजय देवगणचा लूक दाखवून एक हिंट दिली आहे. त्यातून चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची दिग्दर्शकांनी उत्सुकता वाढवली आहे. दुसऱ्या भागात अजय देवगणचा पूर्ण वेगळा लूक दिसत आहे.

‘दृश्यम २’ चा हा टीझर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. याआधी या चित्रपटाचं पोस्टर समोर आलं होतं, त्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिषेक पाठकने केलं आहे.

हेही वाचा : “आम्ही तुला गमावले…” लाडक्या श्वानाच्या निधनानंतर अजय देवगण भावूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजय देवगणचा ‘दृश्यम’ चित्रपट २०१४ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केलं होतं. या चित्रपटात अजयसह श्रिया सरन, तब्बू, इशिता दत्ता यांच्या मुख्य भूमिका होत्या. कमी बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने ६७.१७ कोटी रुपयांचं कलेक्शन केलं होतं. आता याचा दुसरा भाग येत्या १८ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.