बॉलीवूड सुपरस्टार अजय देवगण, अर्जुन रामपाल, रणदीप हुड्डा आणि संगीत दिग्दर्शक जोडी सलीम-सुलेमान यांनी सुपर फाइट लीगमध्ये सहभाग घेतला आहे. या लीगमध्ये केवळ पुरुषच नाही तर स्त्रियाही सहभाग घेऊ शकणार आहेत हे त्याचे वैशिष्ट्य आहे. जगातील हे असे पहिले मार्शल आर्ट्स लीग आहे ज्यात पुरुषांसोबत महिलांनाही सहभाग घेता येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुपर फाइट लीगच्या लाँचला गेलेल्या अभिनेता अजय देवगण आणि अर्जुन रामपाल यांनी महिलांच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली. महिलांनी स्वसंरक्षणासाठी मार्शल आर्ट्स शिकण्याची गरज असल्याचे मत या दोन्ही कलाकारांनी यावेळी व्यक्त केले. तसेच, अजय आणि अर्जुनने महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये होत असलेल्या वाढीची कठोर शब्दांमध्ये निंदा केली. मार्शल आर्ट्स शिकल्यानंतर स्त्रियांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन त्यांच्यामध्ये अत्याचाराविरुद्ध लढण्याची ताकद येते. त्याचसोबत पुरुषांपेक्षा महिला या कमजोर असतात या वक्तव्यास अजय देवगणने नाकारले.

अजय देवगण म्हणाला की, मुली या पुरुषांपेक्षा कमजोर असतात असा काही लोकांमध्ये समज आहे. मार्शल आर्ट्स शिकणं म्हणजे स्वसंरक्षणाचीच बाब नसून त्यामुळे स्वतःमध्ये आत्मविश्वासही निर्माण होतो. आत्मविश्वास वाढल्यावर स्त्रिया पुरुषांपेक्षाही जास्त मजबूत बनतात. तर अर्जुन रामपाल म्हणाला की, महिलांचे होत असलेले शोषण ही चितेंची बाब असून त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळेच आम्ही सुपर फाइट लीगमध्ये स्त्रियांचाही समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. अजय देवगन आणि अर्जुन रामपाल हे दोघेही त्यांचे स्वास्थ्य उत्तम राहावे याकरिता मार्शल आर्ट आणि बॉक्सिंगचा सराव करतात. तसेच, बॉलीवूडमध्ये पदार्पण केल्यानंतरच अजयने मार्शल आर्ट शिकण्याकरिता बराच घाम गाळला होता.

दरम्यान, आता करण जोहर आणि काजोल वाद अजून वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. करण जोहरच्या आयुष्यावर लिहिण्यात आलेल्या चरित्रामध्ये स्पष्ट झाले की काजोल आणि त्याची २५ वर्षांची मैत्री ‘ऐ दिल है मुश्किल’ हा सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच तुटली. पण या मागे नक्की काय कारण आहे ते मात्र त्याने सांगितले नाही. गेल्या वर्षी अजय आणि करण यांच्यात भडकलेली वादाची आग अजूनपर्यंत शांतही होत नाही तोवर करणने परत यात तेल ओतले असेच म्हणावे लागेल. एका इंग्रजी वृत्तपत्राने आपल्या वृत्तात असे म्हटले आहे की अजय देवगणने या प्रकरणात समोर यायचे ठरवले आहे. करण फक्त आपल्या पुस्तकाचा खप वाढण्यासाठी या सर्व गोष्टी बोलत आहे. तो नेहमीच लोकांच्या मागे बोलतो. दोन वर्षांपूर्वी जेव्हा करण जोहरने एका पार्टीमध्ये प्रियांका चोप्राबद्दल वाईट गोष्टी बोलल्या होत्या तेव्हा शाहरुख खानही त्याच्यावर भडकला होता असे एका इंग्रजी वृत्तपत्राने अजयच्या निकटवर्तीयांचा हवाला देत म्हटले होते. या वृत्तपत्राने असाही दावा केला की जेव्हा करणने काजोलबद्दल वक्तव्य केले तेव्हा अजयला फार राग आला आणि त्याने करणला फोन करत म्हटले की, ‘तुला सिनेमाबद्दल जे काही बोलायचे असेल ते तो बोलू शकतो पण त्याच्या बायकोबद्दल आणि परिवाराबद्दल त्याने काहीही बोलू नये.’ या संदर्भात अजयने शुक्रवारी एक ट्विटही केले. या ट्विटमध्ये त्याने म्हटले की, कृपया जुन्या मुलाखती छापणे बंद करा. कारण प्रत्येक मुलाखतीत दिलेले उत्तर हे वेळेनुसार बदलत जाते. पण अजयच्या या ट्विटचा संदर्भ करण जोहरशी होता की नाही हे मात्र त्याने स्पष्ट केले नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajay devgn arjun rampal randeep hooda launch worlds first mixed martial arts super fight league
First published on: 15-01-2017 at 11:36 IST