ajay devgn reacts to viral finger dance step of son of sardaar 2 song : काही दिवसांपूर्वीच ‘सन ऑफ सरदार २’ या चित्रपटाचा टीझर लाँच झाला होता. आता या चित्रपटातील ‘पहला तू, दुजा तू’ हे गाणे प्रचंड चर्चेत आहे. या गाण्यावरील अजयच्या डान्स स्टेप्सवरील चर्चा बरीच रंगली.
अजय देवगणने त्याच्या ‘सन ऑफ सरदार २’ चित्रपटातील मृणाल ठाकूरबरोबरच्या ‘पहला तू, दूजा तू’ या गाण्यातील ‘फिंगर डान्स स्टेप’वर होणाऱ्या ट्रोलिंगवर आणि मिम्सवरही प्रतिक्रिया दिली आहे.
हे गाणं काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाल्यानंतर अजय देवगणच्या बोटांनी केलेल्या डान्स स्टेपवर सोशल मीडियावर जोरदार मिम्स व्हायरल झाले. अखेर अजय देवगणने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
त्यावर बोलताना अजय म्हणाला, “मला लोकांबद्दल माहीत नाही. पण, मी तुम्हाला सांगतो की, तुम्ही लोक माझी चेष्टा करता; पण माझ्यासाठी त्या स्टेप्स करणं खूप अवघड होतं. तरीही मी त्या केल्या. त्याबद्दल तरी आभार माना.”
अजय देवगण ‘पहला तू, दूजा तू’च्या स्टेप्सवरील मिम्सबाबत म्हणाला, “हे सगळे मिम्स माझ्या मते खूप मजेदार आहेत आणि खरं तर हाच हेतू होता. लोकांना जेव्हा काहीतरी विनोदी वाटतं आणि आवडतं, तेव्हाच ते प्रचंड व्हायरल होतं. त्यामुळे आम्हाला खरंच खूप आनंद झालाय.”
अजयचे उत्तर ऐकून तिथे उपस्थित असलेले सर्व जण हसायला लागले. मृणाल ठाकूर म्हणाली की, तुम्हाला हे सोपे वाटत असले तरी ते तसे नाही. त्यासाठी खूप मानसिक कसरत करावी लागते.
लोकांना लोकेशन आवडले नाही
’पहला तू…’ हा रोमँटिक ट्रॅक रिलीज होताच, चाहते त्याच्या हुक स्टेपवर नाचण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत. त्यामध्ये फक्त अजय आणि मृणालची बोटे आहेत. अनेक इंटरनेट वापरकर्त्यांनी लोकेशनच्या विचित्र निवडीकडेही लक्ष वेधले. जेथे दोन्ही पात्रं स्मशानभूमीच्या मध्यभागी नाचताना आणि रोमान्स करताना दिसतात.
चित्रपट कधी होणार प्रदर्शित?
विजय कुमार अरोरा दिग्दर्शित या अॅक्शन-कॉमेडी चित्रपटात रवी किशन, विंदू दारा सिंह, नीरू बाजवा व संजय मिश्रा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट २५ जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.