बॉलिवूड अभिनेता अजय देवगण हा नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. सध्या अजय देवगण हा त्याच्या आगामी गंगूबाई काठियावाडी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील अजयच्या लूकचे सर्वजण कौतुक करताना दिसत आहे. अजय हा खूप गंभीर आणि शांत स्वभावाचा अभिनेता असला तरी तो अनेक गंमतीजमती करताना दिसतो. नुकतंच अजयने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे पत्नी काजोलला एक हटके वचन दिले आहे. त्याच्या या पोस्टची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

अजय आणि काजोल ही जोडी बॉलिवूडमधील हिट जोडी म्हणून ओळखली जाते. ते दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. नुकतंच अजय देवगणने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केला होता. त्यात त्याने स्वत:चा आणि काजोलचा एक कोलाज फोटो शेअर केला आहे. याद्वारे त्याने त्याच्या लग्नाचा वाढदिवस लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
Dindori, Mahavikas Aghadi,
दिंडोरीत महाविकास आघाडीतील बंड रोखण्याची धडपड, माकपची जयंत पाटील यांच्याकडून मनधरणी
Post Office FD Rate and Calculations in Marathi
पोस्टाच्या पाच वर्षांच्या FD मध्ये किती परतावा मिळतो? पोस्ट ऑफिसची मुदत ठेव योजना व नफ्याची आकडेवारी पाहा
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो

या फोटोत अजयच्या फोटोखाली २२ आणि २३ फेब्रुवारी ९९ असे लिहिलेले दिसत आहे. यात तो लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे की त्याचे लग्न नक्की २२ फेब्रुवारी किंवा २३ फेब्रुवारी १९९९ मध्ये झाले होते? तर दुसरीकडे काजोलच्या फोटोत ती फार हसतानाचे कॅप्शन देताना दिसत आहे. यात तिच्या फोटोवर २४ फेब्रुवारी १९९९ असे लिहिले असून ही अजय आणि कजोलच्या लग्नाची तारीख आहे. अजयने त्याच्या या पोस्टला आठवण (Reminder) असे कॅप्शन दिले आहे.

दरम्यान त्याने हाच फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवरही शेअर केला आहे. त्यावर त्याने ‘यंदा विसरणार नाही’, असे लिहिले आहे. तसेच त्याने रिमाइंडरही लावलेला दिसत आहे. त्याच्या या पोस्टवर अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘अमेझिंग कपल’, ‘आम्हालाही आठवण आहे’, ‘मज्जा आली’, ‘लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा’ अशा अनेक कमेंट पाहायला मिळत आहे. तर एका नेटकऱ्याने ‘पत्नीची भीती’ असे लिहिले आहे.

“मीच मूर्ख होते की त्याला दुसरी संधी दिली…”, दीपिका पदुकोणने केला एक्स बॉयफ्रेंडबद्दल धक्कादायक खुलासा

९० च्या दशकातील सुपरहिट अभिनेत्री काजोल आणि अजय देवगण हे बॉलिवूडमधील परफेक्ट जोडपे म्हणून ओळखले जाते. २४ फेब्रुवारी १९९९ मध्ये त्यांचे लग्न झाले होते. काजोल ही सतत बडबड करणाऱ्या स्वभावाची अभिनेत्री आहे. तर अजय देवगण हा खूप शांत व्यक्ती मानला जातो. त्या दोघांनाही एक मुलगा आणि एक मुलगी आहे.