भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे हिच्या आत्महत्येबद्दल नवनवीन खुलासे होत आहेत. ती शनिवारी रात्री हॉटेलमधून मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेली होती, अशी माहिती तिच्या हेअरस्टाइलिस्टने दिली होती. ती नवीन चित्रपटाचे शूटिंग करण्यासाठी आली होती आणि इतर क्रू मेंबर्ससह वाराणसीतील एका हॉटेलमध्ये थांबली होती.

आत्महत्येपूर्वी पार्टीतून आकांक्षाबरोबर आलेला ‘तो’ तरुण कोण? तिला सोडायला रूममध्ये गेला अन्…; हॉटेल मॅनेजरचा मोठा दावा

आकांक्षा ज्या हॉटेलमध्ये थांबली होती त्या हॉटेलच्या मॅनेजरने शनिवारी रात्री घडलेला प्रकार सांगितला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, आकांक्षा शनिवार आणि रविवारी मध्यरात्री १.५५ वाजता हॉटेलमध्ये परतली होती. दरम्यान, हॉटेलमध्ये आकांक्षा दुबे एकटीच आली नव्हती तर तिच्यासोबत एक तरुणही आला होता, असा दावा मॅनेजरने केला होता. हॉटेलमध्ये पोहोचलेली आकांक्षा धडपडत होती. त्यामुळे तिच्याबरोबर आलेला तरुणी तिला रुममध्ये सोडण्यासाठी गेला आणि १७ मिनिटांनी तो परत आला होता, असा दावा मॅनेजरने केला होता. या प्रकरणातील त्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

परिणीती चोप्रा-खासदार राघव चड्ढा विवाहबंधनात अडकणार? दोन्ही कुटुंबियांची बोलणी सुरू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आकांक्षाला हॉटेलमध्ये सोडणाऱ्या व्यक्तीचा पोलिसांनी शोध घेतला आहे. तो तरुण वाराणसीच्या लंका पोलीस स्टेशन परिसरातील टिकरी येथील रहिवासी आहे. पोलीस चौकशीत तरुणाने सांगितले की तो आणि आकांक्षा एकमेकांना चांगले ओळखत होते. शनिवारी रात्री आकांक्षाने त्याला पांडेपूर येथे भेटून लिफ्ट मागितली होती. त्यामुळे तो तिला हॉटेलमध्ये सोडायला आला आणि निघून गेला. सध्या या तरुणाची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.