scorecardresearch

“जेव्हा आम्ही चौघे एकत्र असतो तेव्हा…”, ट्विंकल खन्नाने शेअर केला संपूर्ण कुटुंबाचा हा खास व्हिडीओ

ट्विंकलने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

akshay kumar, twinkle khanna,
ट्विंकलने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना ही चित्रपटसृष्टीत सक्रिय नसली तरी देखील ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ट्विंकल ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच ट्विंकलने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

ट्विंकलने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत ट्विंकल, अक्षय आणि त्यांची दोघं मुलं आरव आणि नितारा दिसत आहेत. ते एकत्र मिळून त्यांच्या गॅलरीत असलेल्या झाडाची सजावट करत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत ट्विंकलने जेव्हा आम्ही चौघे एकत्र आहोत, तेव्हा आम्ही काय करतो याने काही फरक पडत नाही. हृदयात ४० हजार न्यूरॉन्स असतात आणि सध्या प्रत्येक न्यूरॉन हा आनंदाने गाणे गुणगुणत आहे, असे कॅप्शन ट्विंकलने दिले.

आणखी वाचा : शिल्पा शेट्टीने भर स्टेजवर रोहित शेट्टीला मारली लाथ, Video Viral

आणखी वाचा : “अमिताभ समोरच्याला घाबरवतो का?”; किशोर कदम यांनी सांगितला बिग बींसोबत काम करण्याचा अनुभव

ट्विंकलने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट केल्या आहेत. तर, अक्षयने अलीकडेच त्याच्या ‘बच्चन पांडे’ या आगामी चित्रपटाचा टीझर शेअर केला होता. हा चित्रपट १८ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. अक्षय सध्या ‘OMG 2’ आणि ‘राम सेतू’ या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय अक्षय ‘रक्षाबंधन’, ‘सिंड्रेला’, ‘डबल एक्स एल’, ‘ड्रायव्हिंग लायसन्स’, ‘राऊडी राठौर २’ मध्ये दिसणार आहे. तर या आधी त्याचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Akshay kumar and twinkle khanna seen decorating a tree with dream catchers along with their kids watch video dcp

ताज्या बातम्या