akshay kumar anger reaction video viral : ‘हाऊसफुल ५’च्या यशानंतर अक्षय कुमारने लंडनमध्ये सुटीचा आनंद घेतला. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामध्ये तो परवानगीशिवाय व्हिडीओ रेकॉर्ड केल्याबद्दल एका चाहत्यावर रागावताना दिसत आहे.
व्हिडीओमध्ये तो त्या चाहत्याबरोबर सेल्फी काढतानाही दिसत आहे. आता त्या चाहत्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि त्याचा मुद्दा मांडला आहे.
अक्षय कुमार का रागावला?
चाहत्याने एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने अक्षय कुमारच्या रागाचे कारण स्पष्ट केले आहे. चाहत्याने म्हटले आहे, “मी ऑक्सफर्ड स्ट्रीटच्या सिग्नलवर उभा होतो, तेव्हा मला अक्षय कुमारसारखी एक व्यक्ती दिसली. पुष्टी करण्यासाठी मी त्याच्यामागे जाण्याचा निर्णय घेतला. प्रथम मी मागून व्हिडीओ बनवला. नंतर, जेव्हा मी समोरून व्हिडीओ रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने मला पाहिले आणि जवळ येऊन माझा फोन लगेच हिसकावून घेतला. कदाचित तो त्यावेळी गडबडीत असेल. त्याने माझ्या हातातून फोन हिसकावून घेतला आणि माझा हातही धरला.”
मग अक्षय कुमारने फोन परत केला आणि त्याच्याशी मैत्रीपूर्ण संवादही साधला, असे चाहत्याने सांगितले. चाहत्याने सांगितले, “तो (अक्षय कुमार) म्हणाला, ‘माफ करा बेटा, मी सध्या गडबडीत आहे. कृपया मला त्रास देऊ नकोस आणि माझे फोटो किंवा व्हिडीओ काढू नकोस.’ मी त्यांना म्हटले, “तुम्ही हे शांतपणे सांगू शकला असता. आता कृपया माझा फोन परत द्या.”
त्यानंतर अक्षय कुमारने माझा फोन परत केला आणि मला विचारले की- तू कुठून आला आहेस? आणि तू येथे काय करत आहेस? अखेर तो माझ्याबरोबर फोटो काढण्यासही तयार झाला. तो खरोखरच एक चांगला माणूस आहे. तो फक्त ३५-४० वर्षांचा दिसत होता.
अक्षय कुमारच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, त्याच्याकडे अनेक चित्रपट आहेत. अभिनेता लवकरच प्रियदर्शनच्या ‘भूत बंगला’मध्ये वामिका गब्बी आणि परेश रावल यांच्याबरोबर दिसणार आहे. त्याशिवाय सुनील शेट्टी आणि परेश रावल यांच्याबरोबर ‘हेरा फेरी ३’देखील बऱ्याच वादांनंतर अखेर सुरू होत आहे. अक्षय ‘वेलकम टू द जंगल’मध्येही मुख्य भूमिकेत दिसणार आहे, ज्यामध्ये १५ हून अधिक कलाकार आहेत. त्याच्या इतर प्रोजेक्ट्समध्ये ‘जॉली एलएलबी ३’ व ‘हैवान’ यांचा समावेश आहे.