बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अक्षयचे लाखो चाहते आहेत. अक्षयचे एका वर्षात अनेक चित्रपट पाहायला मिळतात. अक्षय एका वर्षात जवळपास ४ चित्रपट करतो. अक्षयकडे अफाट संपत्ती आहे हे आपल्या सगळ्यांना ठावूक आहे. कोटींच्या संपत्तीचा मालक असलेला अक्षय त्याच्या मुलाकडून एक-एक रुपयाचा हिशोब घेतो.
अक्षयकडे कोणत्याही गोष्टीची कमी नाही. अक्षयकडे स्वत:चे खासगी जेट आहे. यावरून तुम्ही अंदाज लावू शकतात की त्याच्याकडे किती संपत्ती आहे. तरी देखील अक्षय एक-एक रुपयाचा हिशोब ठेवतो. याच कारण म्हणजे, अक्षय त्याच्या मुलांना पॉकेट मनी म्हणून थोडे पैसे देतो आणि त्याचा सगळा हिशोब विचारतो.
आणखी वाचा : “पहिल्यांदा किस करताना मला…”, गिरिजा ओकने सांगितला कॉलेजमधला ‘तो’ विचित्र अनुभव
सध्या अक्षय त्याच्या कामात व्यस्त असला तरी देखील त्याचं मुलांकडे लक्ष असतं. याचं कारण म्हणजे अक्षयला वाटतं की त्याच्या मुलांना पैशाचं महत्त्व कळावं आणि जर मुलांना पैसे देऊन त्याचा हिशोब घेतला नाही तर त्यांना त्याच महत्त्व कळणार नाही. यावरून अक्षयने त्याच्या मुलांना किती चांगले संस्कार दिले आहे हे कळते.
आणखी वाचा : शिल्पा शेट्टीने भर स्टेजवर रोहित शेट्टीला मारली लाथ, Video Viral
आणखी वाचा : पुष्पाची एण्ट्री होताच श्रेयस तळपदेला आली चक्कर, पाहा Video
अक्षयने अलीकडेच त्याच्या ‘बच्चन पांडे’ या आगामी चित्रपटाचा टीझर शेअर केला होता. हा चित्रपट १८ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. अक्षय सध्या ‘OMG 2’ आणि ‘राम सेतू’ या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय अक्षय ‘रक्षाबंधन’, ‘सिंड्रेला’, ‘डबल एक्स एल’, ‘ड्रायव्हिंग लायसन्स’, ‘राऊडी राठौर २’ मध्ये दिसणार आहे. तर या आधी त्याचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.