scorecardresearch

पुष्पाची एण्ट्री होताच श्रेयस तळपदेला आली चक्कर, पाहा Video

‘पुष्पा’ चित्रपटात अभिनेता अल्लू अर्जुनने मुख्य भूमिका साकारली आहे.

pushpa, allu arjun, Shreyas Talpade,
'पुष्पा' चित्रपटात अभिनेता अल्लू अर्जुनने मुख्य भूमिका साकारली आहे.

बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. गेल्या काही दिवसांपासून श्रेयस हा दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या पुष्पा या चित्रपटामुळे चर्चेत आला होता. पुष्पा या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जेनसाठी श्रेयसने दिलेला आवाज प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. तेव्हा पासून त्याच्या लोकप्रियतेत चांगलीच वाढ झाली आहे. श्रेयस हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. नुकताच श्रेयसने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

श्रेयसने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा एक एडिटेड व्हिडीओ आहे. या व्हिडीओत श्रेयस बोलतो, ‘मला हात लावण्याची कुणात हिंमत आहे का?’ यानंतर, ‘पुष्पा’ ची एण्ट्री होत असल्याचं दिसतं. चित्रपटातले काही सीन दाखवण्यात आले आहे. त्यानंतर श्रेयस बोलतो अरे हे तर आपल्याकडे येत आहेत असं दिसतयं. नंतर जसा पुष्पा जवळ येतो तर श्रेयसला चक्क येत असल्याचे दाखवले आहे.

आणखी वाचा : आमिर खाननंतर धनुषने पाहिला ‘झुंड’ नागराज मंजुळेंची स्तुती करत; म्हणाला…

आणखी वाचा : रितेशचा ‘श्रीवल्ली’ गाण्यावर डान्स पाहताच जिनिलियाने दिला धक्का अन्…

‘पुष्पा : ज राइज’ चित्रपटाबद्दल बोलायचे तर हा चित्रपट लाल चंदनाच्या तस्करीवर आधारित आहे. ज्यात अभिनेता अल्लू अर्जुनने ‘पुष्पा’ ही व्यक्तीरेखा साकारली आहे. याशिवाय या चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदानाचीही मुख्य भूमिका आहे. हा चित्रपट १७ डिसेंबरला प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवला आहे. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतरही प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत तेवढीच क्रेझ पाहायला मिळाली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-03-2022 at 14:56 IST

संबंधित बातम्या