आईला ICU मध्ये दाखल केल्याने अक्षय कुमार लंडनहून भारतात परतला

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अरुणा भाटिया यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आलं असल्याने अभिनेता अक्षय कुमार त्वरित लंडनहून मुंबईत परतला आहे. अक्षय कुमार दिग्दर्शक रंजीत तिवारी यांच्या ‘सिंड्रेला’ सिनेमाच्या शूटिंगसाठी काही दिवसांपासून लंडनमध्ये होता. मात्र आईच्या प्रकृतीची माहिती मिळताच अक्षय मुंबईत परतला आहे. ज्या […]

akshay-kumar-mother-sick
(File Photo)

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अरुणा भाटिया यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आलं असल्याने अभिनेता अक्षय कुमार त्वरित लंडनहून मुंबईत परतला आहे. अक्षय कुमार दिग्दर्शक रंजीत तिवारी यांच्या ‘सिंड्रेला’ सिनेमाच्या शूटिंगसाठी काही दिवसांपासून लंडनमध्ये होता. मात्र आईच्या प्रकृतीची माहिती मिळताच अक्षय मुंबईत परतला आहे.

ज्या सीनमध्ये अक्षय कुमार नाही ते सीन पूर्ण करून घेण्यास अक्षयने दिग्दर्शकाला सांगितलं असल्याचं कळतंय. अक्षयच्या आई अरुणा भाटिया यांना मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात दाखल केल्याचं वृत्त आहे. अद्याप अरुणा भाटिया यांना नेमकं काय झालंय याची माहिती समोर आलेली नाही.

हे देखील वाचा: “… तर विराट कोहली माझा शिरच्छेद करेल”; अनुष्का शर्माबद्दल विचारलेल्या प्रश्नावर कुणाल कपूरचं उत्तर

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अक्षय कुमारचं त्याच्या आईशी खूपच जवळचं नातं आहे. गेल्या वर्षी अक्षय कुमारने लंडनमध्ये आपल्या आईसोबत वेळ घालवण्याबाबत एक इमोशनल पोस्ट शेअर केली होती.

अक्षय कुमार लंडनमध्ये ‘सिंड्रेला’ सिनेमाचं शूटिंग करत होता. या सिनेमात अभिनेत्री रकुलप्रीत सिंह मुख्य भूमिकेत झळकणार आहे.यासोबतच अक्षय कुमार कुमार ‘सूर्यवंशी’, ‘अतरंगी रे’, ‘रक्षा बंधन’, ‘राम सेतु’ आणि ‘पृथ्वीराज’ या सिनेमातही झळकणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Akshay kumar back from london mother aruna bhatiya hospitalized in icu kpw