वाद आणि विरोधानंतरही ‘लक्ष्मी’ प्रसन्न, जगभरात केली इतकी कमाई

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी माहिती दिली आहे..

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत ‘लक्ष्मी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा चित्रपट डिस्ने हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. ‘लक्ष्मी’ हा चित्रपट परदेशातील काही चित्रपटगृहांमध्ये देखील प्रदर्शत करण्यात आला होता. आता या चित्रपटाने किती कमाई केली हे समोर आले आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत ‘लक्ष्मी’ चित्रपटाच्या वर्ल्डवाइड कलेक्शनबाबत माहिती दिली आहे. मार्च २०२० पासून ते आतापर्यंत अक्षय कुमारचा लक्ष्मी हा बॉलिवूडमधील पहिला चित्रपट आहे जो वर्ल्डवाइड प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि फिजी येथे चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला अशी माहिती तरण आदर्श यांनी दिली आहे.

पुढे आणखी एक ट्विट करत लक्ष्मी चित्रपटाने केलेल्या कमाई विषयी माहिती दिली आहे. लक्ष्मी चित्रपट ९ नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि फिजी येथे प्रदर्शित झाला. ऑस्ट्रेलियामध्ये चित्रपटाने ४०.०९ लाख रुपये कमाई केली.

न्यूझीलंडमध्ये ‘लक्ष्मी’ चित्रपटाने २८.३८ लाख रुपये कमाई केली.

फिजीमध्ये १०.३४ लाख रुपये कमाई केली आहे.

लक्ष्मी चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी वादाच्या भोवऱ्याच अडकला होता. करणी सेनेने ‘लक्ष्मी बॉम्ब’ या नावावर आक्षेप घेत विरोध केला होता. तसेच श्री राजपूत करणी सेनेकडून वकील राघवेंद्र मेहरोत्र यांनी निर्मात्यांना नोटीस पाठवली होती. चित्रपट निर्मात्यांनी जाणूनबुजून ‘लक्ष्मी’ हे नाव शीर्षकात वापरल्याचा उल्लेख या नोटिशीत केला होता. हिंदू धर्मातील देवदेवतांचा अपमान केल्यामुळे भावना दुखाविल्याचे त्यात नमूद करण्यात आले होते. त्यानंतर चित्रपटाचे नाव बदलून ‘लक्ष्मी’ ठेवण्यात आले.

‘लक्ष्मी’ हा चित्रपट ‘कंचना ’ या तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक असल्याचे म्हटले जात आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात एका ट्रान्सजेंडर भूताने अक्षयच्या शरीराचा ताबा मिळवलेला असतो. तसेच ओटीटी प्लॅटफॉर्म वितरकांनी या चित्रपटाचे हक्क तब्बल १२५ कोटी रुपयांना खरेदी केल्याचे म्हटले जात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Akshay kumar laxmii worldwide box office collection avb

Next Story
प्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा!
ताज्या बातम्या