scorecardresearch

आईच्या आठवणीत अक्षय कुमार भावूक, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

अक्षय हा त्याच्या आईच्या आठवणीत भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

आईच्या आठवणीत अक्षय कुमार भावूक, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ चित्रपट नुकताच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगलं यश मिळालं आहे. तसेच हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. तर दुसरीकडे त्याचा आगामी चित्रपट पृथ्वीराजचा टीझर रिलीज झाला आहे. याचीही चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. मात्र नुकतंच अक्षय हा त्याच्या आईच्या आठवणीत भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

अक्षयने नुकतंच त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. याला कॅप्शन देताना तो आईच्या आठवणीत भावूक झाला आहे. अक्षयने शेअर केलेल्या या व्हिडीओत तो थेट कॅमेऱ्यात न बघता आजूबाजूला बघताना दिसत आहे. यावेळी त्याचे केस हवेत उडताना दिसत आहे. तर त्याच्या चेहऱ्यावर दुःखाचे भाव पाहायला मिळत आहे.

या व्हिडीओतील त्याचा हा लूक आगामी चित्रपट ‘रामसेतू’साठी करण्यात आला आहे. केवळ २० सेकंदाचा व्हिडीओ शेअर करताना अक्षय म्हणाला, “मला आज माझ्या आईची खूप आठवण येतेय,” असे कॅप्शन त्याने दिले आहे. त्याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.

“हिंदुस्तान का शेर आ रहा है”, अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’ सिनेमाचा दमदार टीझर रिलीज

दरम्यान अक्षय कुमार याची आई अरुणा भाटिया यांचे गेल्या महिन्यात निधन झाले. सोशल मीडियाच्या माध्यमातून अक्षयने आईच्या निधनाची दु:खद बातमी दिली होती. आईची प्रकृती बिघडल्याचे कळताच अक्षय चित्रीकरण सोडून मुंबईत आला होता. तो ‘सिंड्रेला’ या चित्रपटाचे चित्रीकरण करत होता. 

अक्षय कुमारने आईच्या निधनानंतर एक भावूक ट्वीट केले होते. यात तो म्हणाला होता की, “ती माझे सर्वस्व होती आणि आज मला तिच्या जाण्याने अंतःकरणात असह्य वेदना होत आहेत. माझी आई श्रीमती अरुणा भाटिया यांनी आज जगाचा निरोप घेतला आहे आणि ती माझ्या वडिलांकडे दुसऱ्या जगात गेली आहे. या कठीण काळात माझ्या कुटुंबासाठी तुम्ही केलेल्या प्रार्थनांना आदर करतो. ओम शांती” अशा आशयाचे ट्वीट अक्षयने केले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-11-2021 at 15:57 IST

संबंधित बातम्या