बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अक्षयचा मुलगा आरव हा नेहमीच पॅपाराझी पासून लांब राहतो. पण यावेळी आरव हा नुकताच ट्विंकल खन्नासोबत मुंबईत दिसला. यावेळी त्याने ग्रीन स्लिंग बॅग घेतली होती. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यामुळे त्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले आहे.

आरव आणि ट्विंकलचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत ट्विंकल आणि आरव मुंबईत शॉपिंग करत असल्याचे दिसत आहे. तर ट्विंकल पुढे चालते. तर आरव पाठून शॉपिंग बॅग आणि यासोबतच तिची हिरव्या रंगाची स्लिंग बॅग घेतल्याचे दिसते.

आणखी वाचा : “जात…जात नाही तोवर…”, केदार शिंदे यांनी ‘झुंड’ चित्रपटावरुन केलेले ट्वीट चर्चेत

आणखी वाचा : “पहिल्यांदा किस करताना मला…”, गिरिजा ओकने सांगितला कॉलेजमधला ‘तो’ विचित्र अनुभव

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी अक्षयचा मुलगा आरवला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एक नेटकरी म्हणाला की, “मुलगा आहे, मला वाटलं की सुरक्षा रक्षक आहे.” दुसरा नेटकरी म्हणाला, “करण जोहरसारखा आहे आरव.” तिसरा नेटकरी म्हणाला, “हे सांग मुलींसारखं का वागतोयस…आणि पर्स पण घेतली आहेस.” आणखी एक नेटकरी म्हणाला, “सुरक्षा रक्षक”, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले आहे.

आणखी वाचा : टप्पूसोबत बाल विवाह करणारी टिना, पाहा आता कशी दिसते

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१७मध्ये आरव पीव्हीआरच्या बाहेर एका मुलीसोबत दिसला होता. दोघेही चित्रपट पाहून बाहेर पडत असावेत. पण आरव आणि त्याच्या मैत्रिणीवर कॅमेऱ्याची नजर पडताच त्यांनी तोंड लपवायला सुरुवात केली. आरव केवळ दिसायलाच सुंदर नाही तर तो अक्षयसारखा मार्शल आर्टिस्टही आहे. वयाच्या १४ व्या वर्षी आरवला फर्स्ट डिग्री ब्लॅक बेल्ट मिळाला. आरव आता २० वर्षांचा होणार आहे. त्यांचा जन्म सप्टेंबर २००२ मध्ये झाला.