scorecardresearch

…म्हणून मी आणि ट्विंकल एकमेकांना सरप्राईज देत नाही, अक्षय कुमारने सांगितले कारण

बॉलिवूडमधील सर्वात आदर्श कपल म्हणून त्यांना ओळखले जाते.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि पत्नी ट्विंकल खन्नाची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. बॉलिवूडमधील सर्वात आदर्श कपल म्हणून त्यांना ओळखले जाते. या दोघांनी १७ जानेवारी २००१ ला सप्तपदी घेतली होती. आज त्यांच्या लग्नाला २१ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांच्यातील प्रेम हे दिवसागणिक वाढत असून त्यांना सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल म्हणून ओळखले जाते.

आपला जोडीदार अक्षय कुमारसारखा असावा असे प्रत्येक मुलीचे स्वप्न असते. अक्षयकडे असणारे प्रत्येक गुण त्याच्यात असावेत, अशीही अनेक मुलींची अपेक्षा असते. अक्षय त्याची पत्नी ट्विंकल, आरव आणि नितारा या दोन मुलांची नेहमी काळजी घेताना दिसतो. काही वर्षांपूर्वी अक्षय कुमारने ट्विंकलचे प्रचंड कौतुक केले होते. यावेळी त्याने ती कशाप्रकारे त्याला आधार दिला याबद्दल सांगितले.

अक्षय कुमारने २०१३ मध्ये फिल्मफेअरला एक मुलाखत दिली होती. यावेळी अक्षय कुमार म्हणाला, “ट्विंकलने केवळ माझे कपाट नाही तर माझा बँक बॅलन्सही वाढवला आहे. त्याने माझे कपाट सुधारले आहे. मी फार विखुरलेला माणूस होतो. पण तिनेच मला एकत्र धरुन ठेवले आहे. लग्नानंतर तिने मला एका विशिष्ठ पद्धतीने हाताळले आहे. जेव्हा-जेव्हा मी तुटलो आहे, तेव्हा तिने मला भावनिक आधार दिला आहे. मी माझ्या आयुष्यात जेव्हा कधी अडचणीत अडकलो आहे आणि त्याचा सामना करण्यात मला ट्विंकलने साथ दिली आहे.”

…म्हणून रवीना टंडनने घेतली होती सलमान खानसोबत कधीही काम न करण्याची शपथ

“मी इतर पतींप्रमाणे माझी पत्नी ट्विंकल खन्नाला एकदा किंवा दोनदा सरप्राईज देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तिला ते सरप्राईज आवडले नाही. यावर अक्षय म्हणाली की, एक सर्वसामान्य नवरा म्हणून मी एक दोनदा तिला सरप्राईज देण्याचा प्रयत्न केला होता. पण तिने तिला आवडले नाही, असे सांगितले. त्यानंतर आम्ही दोघांनीही एकमेकांना सरप्राईज द्यायचे नाही,” असे ठरवले आहे.

आता आम्ही दोघांनीही असे ठरवले आहे की, “मी तुला एक ठराविक बजेट देतो. तुम्ही स्वत: त्या ठिकाणी जा आणि तुम्हाला हवे ते त्या पैशातून खरेदी करा. नाहीतर अनेकदा असे होते की मी एखाद्यावेळी ज्वेलरी आणली तर त्यावर बायकोची प्रतिक्रिया फार छान सुंदर अशी असते. पण खरतर ती हे खूप घाणेरडे आहे असा विचार करत असते. त्यानंतर ती नवऱ्याला विचारते, ‘तुमच्याकडे बिल आहे का? मी ते बदलून घेईन. असे सांगते. या सर्व कारणांमुळे मी ट्विंकलला सरप्राईज देत नाही,” असे अक्षयने सांगितले.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Akshay kumar twinkle khanna 21st wedding anniversary revealed why they not surprise each other know the answer nrp