बॉलिवूडचा खिलाडी कुमार अभिनेता अक्षय कुमार काश्मीरमधल्या बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेझ व्हॅलीमध्ये नियंत्रण रेषेजवळील एका गावात पोहोचला. त्यावेळी अक्षयने बीएसएफ सैनिकांशी संवाद साधला. अक्षय दुपारी बाराच्या सुमारास हेलिकॉप्टरने तिथे पोहोचला. या वेळी जम्मू-काश्मीर पोलिसांसोबत सैनिक आणि सैन्य अधिकारीही उपस्थित होते. अक्षयने त्यांच्यासोबत डान्सही केला. त्याचे फोटो आणि व्हिडिओ  सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून समोर आले आहेत. काही फोटो स्वत: अक्षयने शेअर केले आहेत.

अक्षयने हे फोटो त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले आहेत. “बीएसएफ सोबत एक अविस्मरणीय दिवस घालवला. बीएसएफचे सैनिक आज सीमेचे रक्षण करत आहेत. इथे आल्यावर मी नेहमीच विनम्र होतो….या हीरोंना भेटल्यावर माझ्या हृदयात फक्त एक आदर असतो,” अशा आशयाचे ट्वीट अक्षयने केले आहे. अक्षयचे हे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.

अक्षय भारतीय सैन्य आणि सैनिकांच्या मदतीसाठी नेहमीच पुढे येतो. २०१७ मध्ये त्याने सैनिकांसाठी ‘भारत के वीर’ नावाचा एक उपक्रमसुद्धा सुरू केला. या माध्यमातून देश आणि लोकांच्या सुरक्षेचे कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या सैनिक आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या कुटूंबियांची मदत केली जाते.

आणखी वाचा : ‘अमृताला कानशिलात लगावली मला त्याच वाईट वाटतं नाही’, इशा देओलने केला खुलासा

आणखी वाचा : Video : दोन महिन्यानंतर जुही घरी परतल्यानंतर मुलीने दिली अशी प्रतिक्रिया

दरम्यान, अक्षयच्या अनेक चित्रपटांमध्ये त्याच्या देशभक्तीची झलक पाहायला मिळाली आहे. अक्षयचे ‘सैनिक’, ‘बेबी’, ‘हॉलिडे’सारखे अनेक चित्रपट येऊन गेले आहेत. आता लवकरच अक्षयचे ‘बेल बॉटम’ आणि ‘सुर्यवंशी’ हे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.