अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी हे मराठी मालिकांमधील बहुचर्चित जोडप्यांपैकी एक आहे. अक्षया-हार्दिकने साखरपुडा करत चाहत्यांना सुखद धक्काच दिला. मे महिन्यात या दोघांचा साखरपुडा थाटामाटात पार पडला. काही कलाकार मंडळींनी अक्षया-हार्दिकच्या साखरपुड्याला हजेरी लावली होती. लवकरच हे दोघं विवाहबंधनात अडकणार आहेत. पण त्याचपूर्वीच अक्षया-हार्दिक लंडनला गेले आहेत. दोघांनीही इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली.

आणखी वाचा – “माझ्या पतीसह आम्ही सगळेच नशेमध्ये होतो अन्…”; राधिका आपटेनेच सांगितलं स्वतःच्या लग्नात नेमकं काय घडलं?

अक्षया-हार्दिक सध्या लंडनमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहेत. इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे दोघांनी लंडनमधील काही व्हिडीओ तसेच फोटो शेअर केले आहेत. लग्नापूर्वीची त्यांची ही ट्रिप सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. हार्दिकने अक्षयाबरोबर फोटो शेअर करत “हॅशटॅग लंडन” असं म्हटलं आहे. या फोटोमध्ये अक्षया-हार्दिक अधिक गोड दिसत आहेत. तसेच लंडनमधील वेगवेगळ्या ठिकणी हे सेलिब्रिटी कपल सध्या फिरत आहे.

लंडन ट्रिपवरुन परतल्यानंतर अक्षया-हार्दिक लग्नाच्या तयारीला सुरुवात करतील. पुण्यामध्येच या दोघांचा विवाहसोहळा संपन्न होणार असल्याचं बोललं जात आहे. तसेच या विवाहसोहळ्याला कोण कोण हजेरी लावणार? अक्षया-हार्दिकचा लूक कसा असणार? हे काही दिवसांनी समजेलच. पण त्यापूर्वी अक्षया-हार्दिक एकमेकांना पुरेसा वेळ देत आहेत.

आणखी वाचा – Photos : “एका लग्नाच्या अनेक गोष्टी असं झालंय आता”; प्रशांत दामले यांनी शेअर केले कुटुंबाबरोबरचे सुंदर फोटो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या राणादा आणि पाठकबाईंच्या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. दोघंही अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करताना दिसले होते. त्यांच्यातील खास मैत्रीची चर्चा अनेकदा सोशल मीडियावर रंगली. मात्र त्यांनी याबाबत कधीच स्पष्टपणे भाष्य केलं नव्हतं. अखेर आता या जोडीनं आपल्या नात्याला नाव देत आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे.