अली फजल आणि ऋचा चड्ढा यांनी केलं गुपचूप लग्न? अली म्हणाला, “बेगम….”

हल्ली ते दोघेही लग्नासंबंधीचे पोस्ट शेअर करत आहेत. त्या दोघांनीही गुपचूप लग्न उरकल्याची चर्चा सध्या पसरू लागली आहे.

richa-chadha-ali-fazal-759
(Photo: Ali Fazal/Instagram)

बॉलीवूड अभिनेता अली फजल आणि ऋचा चड्ढा हे दोघेही गेल्याच वर्षी लग्न करणार होते. पण देशभरात सुरू असलेल्या करोना परिस्थितीमुळे त्यांनी लग्नाची तारीख पुढे ढकलली होती. हे दोघेही त्यांच्या सोशल मीडियावर अकाउंटवर बरेच सक्रिय असतात. त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एकमेकांसोबत पोस्ट शेअर करत असतात. गेल्या काही दिवसांपासून ते दोघेही लग्नासंबंधीचे पोस्ट शेअर करताना दिसून येत आहेत. त्या दोघांनीही गुपचूप लग्न उरकले असल्याची चर्चा सध्या पसरू लागली आहे.

अभिनेता अली फजलने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून या चर्चांसाठी आणखी एक कारण दिलंय. अभिनेता अली फजलने नुकतंच त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर त्यांच्या लग्नाची हिंट दिलीय. यासोबत त्याने एक भलीमोठी पोस्ट लिहून “ऋचा, तुम सिर्फ मेरी बेगम हो”, असं म्हटलंय. त्यामूळे दोघांनी गुपचूप लग्न उरकल्याच्या चर्चांना उधाण आलंय.

 

अलीने लिहिली ही पोस्ट

अलीने ऋचासोबतचा एक फोटो शेअर करून लिहिलंय, “सगळ्यात जास्त सेक्सियस्ट मुलगी, त्या मुलीला मी ओळखतो, होय…मला हे बोलावं लागणार आहे की तू फक्त माझी आहेस…”. यापुढे विनोदी अंदाजात अलीने लिहिलं, “फोन तर उचल बेगम…फोन उचल लवकर… फोन सुम सुमा सिम फोन…”. यापुढे लिहिताना अलीने ऋचासाठीचं प्रेम देखील व्यक्त केलंय.

अलीने लिहीलेल्या या पोस्टवर ऋचाने सुदधा आपल्या अनोख्या अंदाजात उत्तर दिलंय. “हाहाहाहाहा…फोनमध्ये मिळत नाहीये…आठवतंय…? मी तुला कॉल करू शकते का? मिया लोकांना वाटेल हे दुःख आहे…पण सगळे मजेत आहेत…”. ऋचाने दिलेलं हे उत्तर पाहून त्यांनी गुपचूप लग्न केलेल्या चर्चांना खात्री मिळताना दिसून येतेय.

अली-ऋचा या दोघांनीही यापूर्वी ‘फुकरे’ आणि ‘फुकरे रिटर्न्स’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. रिल लाईफ कपलची भूमिका करताना ते रिअल लाईफ कपल झाले आणि जवळजवळ सहा वषापासून ते एकमेकांना डेट करत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ali fazal richa chadha tied knot secretly mirzapur actor gave hint post viral prp