सध्या बॉलिवूडमधील अनेक कलाकार लग्नबंधनात अडकत असल्याचे दिसत आहे. अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ डिसेंबर महिन्यात लग्न करणार आहेत. तर अभिनेत्री पत्रलेखा आणि राजकुमार राव यांचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. तसेच आदित्य सील आणि अनुष्का रंजन हे देखील लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. त्यांच्या संगीत सोहळ्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली. दरम्यान, आलिया भट्टने परिधान केलेल्या कपड्यांमुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.
आलियाने नुकतीच आदित्य आणि अनुष्काच्या संगीत कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यावेळी तिने पिवळ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. या लूकमध्ये आलिया अतिशय सुंदर दिसत होती. पण लेहेंग्यावर घातलेल्या ब्लाऊजमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
आणखी वाचा : कमल हासन करोना पॉझिटिव्ह, ट्वीट करत सर्व सामान्यांना दिला सूचक इशारा, म्हणाले…
एका यूजरने, ‘फॅशन डिझायनर ऑफ द इअरचा अवॉर्ड आलिया भट्टला द्यायला हवा’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘आलियाने हे काय घातले आहे’ असे म्हटले आहे. तिसऱ्या एका यूजरने ‘लवकर लवकर पोहोचण्याच्या नादात आलियाने ब्लाऊच उलटे घातले आहे’ अशी कमेंट करत आलियाला ट्रोल केले आहे.

आलिया आणि रणबीर २०२१ मध्ये विवाहबंधनात अडकणार होते. मात्र त्यांनी काही कारणात्सव हे लग्न पुढे ढकलले आहे. आलिया-रणबीर हे येत्या डिसेंबरमध्ये लग्न करु शकतात, असे बोललं जात आहे. मात्र अद्याप त्यांच्या लग्नाबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तर दुसरीकडे विकी कौशल आणि कतरिना कैफ डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याची चर्चा आहे. मात्र याबाबतही कोणताही दुजोरा मिळालेला नाही.
आलिया आणि रणबीर दोघेही गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटींग आणि प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. आलिया ही ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘RRR’, ‘डार्लिंग्स’, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात व्यस्त आहे. यातील ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाचे शूटींग अद्याप बाकी आहे. तर रणबीर हा सध्या ‘शमशेरा’, ‘ऐनिमल’ या सारख्या चित्रपटात व्यस्त आहे.