आलिया भट्ट ही बॉलीवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचे फोटो आणि व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. आता आलियाचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती पापाराझींना ओरडताना दिसत आहे. कॅमेऱ्यात तिचा पापाराझींवरील राग स्पष्ट दिसत आहे. संपूर्ण प्रकरण काय आहे ते जाणून घेऊया.

ही घटना आलिया भट्ट पिकलबॉल गेमसाठी आली तेव्हा घडली आणि तिच्या गाडीतून उतरल्यानंतर तिला दिसले की काही पापाराझी इमारतीच्या आवारात तिचे फोटो काढण्याचा प्रयत्न करत आहेत. हा व्हिडीओ फिल्मज्ञानच्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर करण्यात आला आहे.

आलिया भट्ट पापाराझींवर का रागावली?

व्हिडीओमध्ये असे दिसून येते की, आलिया भट्ट इमारतीत प्रवेश करताच पापाराझी तिला घेरतात, ज्यामुळे ती संतापते. संतापलेली आलिया भट्ट म्हणते, ‘गेटमधून आत येऊ नका, ही तुमची इमारत नाही, कृपया बाहेर जा, तुम्ही बाहेर जा, ही तुमची इमारत नाही, तुम्ही आत येऊ शकत नाही, तुम्ही ऐकत नाही आहात.” आलिया भट्टचा हा व्हिडीओ इंटरनेटवर खूप वेगाने व्हायरल झाला आहे.

यापूर्वी, १४ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वॉर २’ च्या स्क्रीनिंगला आलिया भट्ट तिची आई सोनी राजदानबरोबर दिसली होती. या हाय-ऑक्टेन ॲक्शन चित्रपटाला समीक्षकांकडून मिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. परंतु, प्रेक्षकांचे लक्ष सर्वात जास्त वेधून घेतले ते चित्रपटाच्या पोस्ट-क्रेडिट सीनने. त्यात YRF च्या पुढील मोठ्या स्पाय थ्रिलर ‘अल्फा’ची पहिली झलक दाखवण्यात आली.

टीझरमध्ये बॉबी देओल एका लहान मुलीबरोबर दिसत आहे, जी स्पाय युनिव्हर्सच्या पुढील चित्रपट ‘अल्फा’मध्ये आलिया भट्टची भूमिका साकारत असल्याचे मानले जाते. आलिया भट्ट या चित्रपटामध्ये तिच्या आतापर्यंतच्या सर्वात अ‍ॅक्शन-पॅक्ड भूमिकेत दिसणार आहे.

आलिया भट्टच्या आगामी चित्रपटांमध्ये YRF चा ‘अल्फा’ हा चित्रपट समाविष्ट आहे. हा एक महिला केंद्रित स्पाय थ्रिलर चित्रपट आहे. याशिवाय, ती संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’मध्येदेखील दिसणार आहे, ज्यामध्ये ती रणबीर कपूर आणि विकी कौशलबरोबर दिसणार आहे. हा एक पीरियड रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे. आलिया नेटफ्लिक्ससाठी एक प्रोजेक्ट प्रोड्यूस करत आहे आणि ती त्यात अभिनयदेखील करत आहे. हा प्रोजेक्ट तिच्या प्रोडक्शन हाऊस इटरनल सनशाइन प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनवला जात आहे.