‘सॉन्ग्स ऑफ पॅराडाईज’ हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट पद्मश्री पुरस्कार विजेत्या राज बेगम यांच्या प्रवासावर आधारित आहे. सोनी राजदान यात मुख्य भूमिकेत आहेत. अलीकडेच, या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, अभिनेत्रीने त्यांच्या ‘पार्टी’ या चित्रपटात काम करण्याचा अनुभव शेअर केला.

सोनी राजदान यांनी तेव्हा चित्रपटसृष्टीत नुकताच प्रवेश केला होता. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानच्या त्यांच्या अनुभवाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, ‘जेव्हा तुम्ही एखाद्या चित्रपटावर काम करत असता आणि दररोज रात्रभर शूट करत असता तेव्हा तुमच्या सर्वात गोड आठवणी म्हणजे पॅक-अप करून झोपायला जाणे. मी गंमत करत आहे, तो एक उत्तम अनुभव होता. आम्ही ज्या पद्धतीने चित्रपटाचे चित्रीकरण केले आहे ते त्या काळासाठी खूप नवीन होते.”

सोनी राजदान पुढे म्हणाल्या की, चित्रपटाचे शूटिंग खूप थकवणारे होते. जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात शूटिंग करत असता तेव्हा तुम्ही रात्रभर तिथेच उभे राहता कारण कलाकार त्यांचे संवाद बोलताना कुठेतरी अडकतात. मला आठवते की तिथे उभे राहून माझे पाय खूप दुखायचे. इतर कलाकारांना पाहून मलाही खूप काही शिकायला मिळाले कारण मी त्या काळात खूप नवीन होते. मला अनेक मोठ्या कलाकारांकडून प्रेरणा मिळाली. पण शूटिंगचा अनुभव खूप थकवणारा होता, म्हणजे, त्यासाठी संपूर्ण रात्र लागत असे.’

‘सॉन्ग्स ऑफ पॅराडाईज’ या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, त्याची निर्मिती एक्सेल एंटरटेनमेंट, अ‍ॅपल ट्री पिक्चर्स प्रोडक्शन आणि रेंज फिल्म्स प्रोडक्शन यांनी केली आहे. हा चित्रपट काश्मीरच्या पहिल्या प्रसिद्ध प्लेबॅक सिंगर राज बेगम यांची कहाणी सांगतो.

‘सॉन्ग्स ऑफ पॅराडाईज’ या चित्रपटात हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझाद आणि सोनी राजदान मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्याशिवाय या चित्रपटात झैन खान दुर्राणी, शीबा चड्ढा, तारक रैना आणि लिलेट दुबे देखील आहेत.