बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टची प्रमुख भूमिका असलेला ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले आहे. या चित्रपटात आलिया भट्टने गंगूबाईची भूमिका साकारली आहे. आलियासोबत या चित्रपटात शंतनू माहेश्वरीनेही स्क्रीन शेअर केली आहे. पण तुम्हाला माहितीये का? संजय लीला भन्साळी यांनी या चित्रपटासाठी आलियाला नव्हे तर दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्राला पसंती दर्शवली होती.

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या गंगूबाई काठियावाडी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. विशेष म्हणजे अनेक चित्रपट समीक्षक, प्रेक्षक आणि बॉलिवूडमधील कलाकार या चित्रपटाचे कौतुक करताना दिसत आहे. या चित्रपटातील आलियाच्या भूमिकेचे विशेष कौतुक केले जात होते. मात्र या भूमिकेसाठी संजय लीला भन्साळी यांनी दीपिका पदुकोणला विचारणा केली होती.

दीपिका पदुकोणने संजय लीला भन्साळी यांच्यासोबत ‘राम लीला’, ‘पद्मावत’, ‘बाजीराव मस्तानी’ हे चित्रपट केले होते. या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान दीपिका ही संजय लीला भन्साळींच्या कार्यालयाबाहेर दिसली होती. त्यानंतर दीपिका आणि आलिया एकत्र स्क्रिन शेअर करु शकतात अशी चर्चा सुरु होती. मात्र काही दिवसांनी या चर्चा खोट्या असल्याचे समोर आलं होतं.

दीपिकानंतर ‘गंगूबाई काठियावाडी’च्या भूमिकेसाठी अभिनेत्री राणी मुखर्जीचीही निवड केली होती. संजय लीला भन्साळी यांच्यासोबत राणी मुखर्जीने ‘ब्लॅक’ चित्रपटात काम केले आहे. पण तिने या भूमिकेसाठी नकार दिला होता. त्यानंतर संजय लीला भन्साळी यांनी प्रियांका चोप्राशी संपर्क साधला होता.

‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटात प्रियांका चोप्रा ही प्रमुख भूमिका साकारणार असल्याची बोललं जात होतं. मात्र प्रियांका चोप्राने ही अफवा असल्याचे सांगितले होते. मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत प्रियांका म्हणाली, “मला याबाबत काहीही कल्पना नाही. मी कोणताही हिंदी चित्रपट साईन केलेला नाही. मी सध्या हॉलिवूडचे दोन चित्रपट करत आहे. यातील एक चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.”

“पप्पा खूप काही खरेदी करू शकतात पण…”, कंगना रणौतची आलिया भट्टवर अप्रत्यक्ष टीका

आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेला ‘गंगूबाई काठियावडी’ हा चित्रपट मुंबईतील कमाठीपुराच्या माफिया क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगूबाई यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केलं आहे. अगदी कमी वयात स्वतःच्या नवऱ्यानेच कमाठीपुरामधील एका कोठ्यावर विकल्यानंतर अनेक संघर्ष करत गंगूबाई तिथल्या माफिया क्वीन कशा झाल्या, याची कथा आता मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. या चित्रपटात अजय देवगण करीम लाला ही भूमिका साकारताना दिसणार आहे.