सलमानशी शत्रूत्व करणा-याला त्याचे परिणाम भोगावे लागतात, हे दिसून आले आहे. आता सलमानच्या बॅड बूकमध्ये सध्या कपिल शर्मा अल्याची चिन्हे आहेत. कॉमेडियन आणि सूत्रसंचालक कपिल शर्मा हा सेलिब्रिटी क्रिकेट लिगचे अॅन्करिंग करत होता. मात्र, त्याच्यात आणि सलमान-सोहेल या खान बंधूमध्ये काही गैरसमज निर्माण झाल्याचे वृत्त आहे.
क्रिकेट लिंगच्या उदघाटन समारंभावेळी कपिल कार्यक्रमातून अचानक बाहेर पडला. त्यामुळे कपिल आणि खान बंधूमध्ये ऑल इज नॉट वेल असे चित्र निर्माण झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कपिलने सरावासाठी वेळ नसल्याचे सांगत शेवटच्या क्षणी कार्यक्रम सोडला.

पण, मुंबई हिरोज आणि तेलगू वरियर्समध्ये झालेल्या सामन्यावेळी कपिल अॅन्करिंग करताना दिसला होता. सामन्यावेळी हुमा कुरेशी, सनी लिओनी, मुंबई हिरोजचा कर्णधार सुनिल शेट्टी आणि संघाचा मालक सोहेल खान यांच्यासोबत तो छायाचित्रातही झळकला होता. हे सगळे पाहता नक्की कपिल शर्मा खरचं सलमानच्या शत्रूंच्या यादीत आला की नाही, हे सांगणे कठीणचं आहे. त्यामुळे कपिल जर बॅड लिस्टमध्ये नसेल आला तर ते त्याच्यासाठी उत्तमच आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.