दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन हा गेल्या काही दिवसांपासून ‘पुष्पा’ या त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याची या चित्रपटातली भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. पण अल्लू अर्जुनच्या नव्या जाहिरातीवरून सोशल मीडियावर त्याला ट्रोल करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अल्लू अर्जुनने नुकतीच झोमॅटो या फूड डिलिव्हरी कंपनीची जाहिरात केली. यात अल्लू अर्जुन मॉलमध्ये काही गुंडांशी लढताना दिसत आहे. तो एका गुंडाला मुक्का मारतो आणि त्यानंतर तो गुंड स्लोमोशनमध्ये खाली पडताना दिसतो. पडताना, गुंड अल्लू अर्जुनला बनी म्हणतं पुढे तेलुगु भाषेत मला लवकर खाली पाड असं सांगतो. यावर अल्लू अर्जुन दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये दाखवण्यात येणाऱ्या अॅक्शन सीक्वेन्सबद्दल बोलतो. “हा दाक्षिणत्य चित्रपट आहे. आम्ही हे असंच करतो.”

Photo : पेडर रोडवरील प्रभाकुंज निवासस्थानातील ‘या’ घरात राहायच्या लतादीदी

यावर, तो गुंड उत्तर देतो की त्याला गोंगुरा मटण खायला जायचं आहे आणि तो जर इतक्या हळू खाली येईल तर तोपर्यंत रेस्टॉरंट्स बंद होतील. अल्लू अर्जुन मग त्याचा फोन दाखवतो आणि तेलुगुमध्ये बोलतो, “गोंगुरा मटण किंवा आणखी काही, Zomato आहे ना तुमच्यासाठी”.शेवटी, अल्लू अर्जुन ‘पुष्पा’ या चित्रपटातला त्याचा डायलॉग बोलत त्याची सिग्नेचर स्टेप करतो.

आणखी वाचा : “मादक दिसण्यासाठी पॅडिंग…”, एरिका फर्नांडिसने सांगितला दाक्षिणात्य चित्रपटातील धक्कादायक अनुभव

Photo : घरात दोनचं खुर्च्या? भारती सिंगचे आलिशान घर पाहिलेत का?

यानंतर नेटकऱ्यांनी अल्लू अर्जुनला सोशल मीडियावर ट्रोल केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की जाहिरातीत दाखवण्यात आलेला स्लोमोशनचा सीक्वेलवरून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीची चेष्टा करण्यात येत आहे. एक नेटकरी म्हणाला, “तुझं मुळ विसरू नकोस, मिस्टर अल्लू अर्जुन.” दुसरा नेटकरी म्हणाला, “हा दाक्षिणात्य चित्रपटाचा अपमान आहे.” काहींनी झोमॅटोबद्दल त्यांचा रागही व्यक्त केला आहे. एक नेटकरी म्हणाला, “जाहिरात पाहिल्यानंतर मी लगेच माझ्या फोनमधला अॅप अनइंस्टॉल करत आहे. दाक्षिणात्य चित्रपटांचे कमी पणा लेखण्यात आले आहे.”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Allu arjun channels pushpa in new adv fans angry after video pokes fun at south indian cinema dcp
First published on: 08-02-2022 at 12:02 IST