scorecardresearch

अंबानींचा शाही थाट! कार्यक्रमाला उपस्थित सर्व पाहुण्यांना चांदीच्या ताटातून जेवण अन् मेन्यूही होता खास

नीता अंबानी यांच्या नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचा उद्घाटन सोहळा अत्यंत भव्य झाला.

ambanis

गेले अनेक दिवस नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरची सर्वत्र चर्चा होती. तर नुकताच या कल्चरल सेंटरचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या उद्घाटन सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. इतकंच नाही तर या कार्यक्रमासाठी आघाडीचे हॉलिवूड स्टार्सही हजर होते. तर मनोरंजन विश्वा बरोबरच इतर अनेक क्षेत्रातली दिग्गज मंडळी या कार्यक्रमात उपस्थित होती. अंबानी यांच्या राजेशाही थाटातच त्यांनी सर्व पाहुण्यांचं आदरातिथ्य केलं.

नीता अंबानी यांच्या नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटन सोहळ्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या कल्चरल सेंटरचा उद्घाटन सोहळा अत्यंत भव्य झाला. यावेळी अंबानी कुटुंबीय आणि तेथे उपस्थित सर्व पाहुण्यांच्या लूकने तर सर्वांचं लक्ष वेधलंच पण याच बरोबर आता या उद्घाटन सोहळ्यातील जेवणाचा मेन्यू चर्चेत आला आहे.

आणखी वाचा : अंबानींची बातच न्यारी! होणाऱ्या धाकट्या सुनेच्या हातातल्या छोट्याशा पर्सने वेधलं लक्ष, किंमत वाचून व्हाल आवाक्

अभिनेते संजय कपूर यांची पत्नी महीप कपूर यांनी या उद्घाटन सोहळ्यातील जेवणाच्या थाळीचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व पाहुण्यांना चांदीच्या ताट आणि वाटीमध्ये जेवण देण्यात आलं. तर जेवणात भारतीय, परदेश असे विविध पदार्थ होते. विविध प्रकारचे स्टार्टर्स, दाल , रोटी, पालक पनीर, हलवा, पापड, लाडू असे अनेक पदार्थ खास पाहुण्यांसाठी बनवण्यात आले होते.

हेही वाचा : Video: “आईला मान खाली घालायला लावली…” चारचौघात काजोलबरोबर केलेल्या ‘त्या’ वागणूकीमुळे न्यासा देवगणवर नेटकरी नाराज

महीपची ही पोस्ट आता खूपच व्हायरल होत आहे. भारतातील आघाडीच्या कलाकारांचे परफॉर्मन्सेस आणि त्याचबरोबर मन तृप्त हे करणारं जेवण ही खरोखरच उपस्थितांसाठी मेजवानी होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-04-2023 at 18:15 IST

संबंधित बातम्या