बॉलीवूडमध्ये ‘कॅटफाईट्स’चे एक-दोन नव्हे तर अनेक किस्से आहेत. बबिता-नीतू कपूर, ऐश्वर्या राय-राणी मुखर्जी, प्रियांका चोप्रा-करीना कपूर, दीपिका पदुकोण-कतरिना कैफ, कंगना रणौत-तापसी पन्नू आणि स्वरा भास्कर अशी अनेक नावे आहेत.
यापैकी एक नाव अमिषा पटेल आणि बिपाशा बासू यांचेही आहे. दोघांमध्ये ३६ चा आकडा आहे. करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात दोघांनीही एकमेकांवर टीका केली होती.
‘फिल्मी मंत्रा’ला दिलेल्या मुलाखतीत अमिषा पटेलने स्पष्ट केले की तिने कधीही कोणाशीही भांडण केले नाही. हे प्रकरण बिपाशा बासूच्या ‘जिस्म’ या चित्रपटाशी संबंधित आहे. बॉलीवूडमधील भांडणं ‘कॉफी विथ करण’ या लोकप्रिय चॅट शोशी जोडलेले आहे. या शोमध्ये सहभागी होताना बिपाशा बासू आणि अमिषा पटेल यांनी एकमेकांबद्दल अशा कमेंट केल्या की त्या एकमेकांच्या कट्टर शत्रू बनल्या. आता ‘गदर’ अभिनेत्री म्हणते की त्यांच्यात असे काहीही नाही. तिने या गोष्टींना केवळ अफवा म्हटलं आहे.
‘कॉफी विथ करण’च्या एका भागात बिपाशा बासूने केलेल्या बॉडी-शेमिंगबद्दल विचारले असता, अमिषा म्हणाली, “मी कधीही त्यावर प्रतिक्रिया दिली नाही, मला वाटतं की हे पब्लिक प्लॅटफॉर्मवर करू नये, पण बिपाशाने ते केले. प्रत्येकाचा स्वतःचा दृष्टिकोन असतो.”
अमिषाने खुलासा केला की तिला अर्जुन रामपालसोबत पुन्हा करणच्या शोमध्ये जायचे होते, परंतु दुर्दैवाने शोच्या काही दिवस आधी तो आजारी पडला आणि तो येऊ शकला नाही. करणने मला विचारले, ‘पुढच्या आठवड्यात होणाऱ्या शोमध्ये तुला काय बोलायचे आहे?’ मी म्हणाले, ‘करण, मी कमेंट करत नाही’ आणि तो म्हणाला, ‘अरे, हे तुझं वागणं दक्षिण मुंबईतल्या लोकांसारखं आहे.’ मी म्हणाले, ‘हो, मी अशीच आहे.’ मी माझ्या कारकिर्दीत कधीही कोणालाही निराश केले नाही. मी कधीच इतक्या खालच्या पातळीवर गेले नाही.”
बिपाशाने केलेली कमेंट…
खरंतर जेव्हा बिपाशा बासू अमिषानंतर ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये दिसलेली, तेव्हा करण जोहरने अभिनेत्रीला सांगितले की, अमिषा पटेल म्हणाली होती की ती कधीही ‘जिस्म’सारखा चित्रपट करणार नाही, कारण तिची आजी रागावेल. यावर प्रतिक्रिया देताना बिपाशाने अमिषाबद्दल कमेंट केली होती. बिपाशा म्हणाली होती, ‘अमिषा असे चित्रपट करत नाही, कारण तिचे शरीर ‘जिस्म’सारख्या चित्रपटासाठी योग्य नाही.’ मी तिला ‘जिस्म’मध्ये कधीच कास्ट केले नसते. इतक्या बोल्ड चित्रपटासाठी ती खूपच बारीक आणि लहान आहे.”