Comedian Kabir Kabeezy Singh Passed Away : भारतीय वंशाचा प्रसिद्ध कॉमेडियन कबीर ‘कबीजी’ सिंग याचे निधन झाले आहे. अवघ्या ३९ व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. ‘अमेरिकाज गॉट टॅलेंट’ची सेमी फायनल गाठल्यामुळे कबीर चर्चेत राहिला होता. त्याने अनेक कॉमेडी शोदेखील केले होते. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये त्याचे निधन झाले, अशी माहिती समोर आली आहे.

कबीर सिंगच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याची प्रकृती बरी नव्हती आणि काही आरोग्य समस्या होत्या, असे वृत्त आहे. पोलीस त्याच्या आकस्मिक मृत्यूचा तपास करत आहेत. कबीरचे निधन तो झोपेत असताना झाले, असं त्याच्या एका मित्राने सांगितलं. टीएमझेडने दिलेल्या माहितीनुसार, कबीरच्या मृत्यूचे कारण जाणून घेण्यासाठी टॉक्सिकॉलॉजी रिपोर्ट काढण्यात येत आहे. कबीर सिंगचे निधन ४ डिसेंबर रोजी झाले, अशी माहिती त्याच्या होणाऱ्या पत्नीने दिली आहे.

हेही वाचा – Pushpa 2 Collection: पहिल्या दिवसापेक्षा दुसऱ्या दिवशी कमाईत घट, ‘पुष्पा 2’ चे एकूण कलेक्शन किती? वाचा

कबीर सिंग यांचे सॅन फ्रान्सिस्कोमध्ये झाले. ‘फॅमिली गाय’ मधील भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेल्या या कॉमेडियनने २०२१ मध्ये ‘अमेरिकाज गॉट टॅलेंट’ द्वारे खूप लोकप्रियता मिळवली. या शोच्या १६ व्या पर्वात त्याने सेमी फायनल गाठून भारताचा गौरव वाढवला होता. कबीरने अनेक ठिकाणी स्टेज शोदेखील केले होते.

हेही वाचा – प्रेमामुळे करिअर संपलं, देशही सोडावा लागला; २५ वर्षांनी मुंबईत परतलेली ममता कुलकर्णी म्हणाली, “मी लग्न केलंच नाही”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारत व अमेरिकेत लोकप्रिय होता कबीर

इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, कबीरचा जन्म पोर्टलँडमध्ये भारतीय आई-वडिलांच्या पोटी झाला होता. तो फक्त नऊ वर्षांचा होता, तेव्हापासून त्याला विनोद करायला आवडायचं. त्यानंतर त्याचे कुटुंबीय मुंबईला परत आले. कबीरने भारतात परतल्यावर भाषेवर प्रभुत्व मिळवले. त्यानंतर तो १३ व्या वर्षी पुन्हा अमेरिकेला गेला होता. भारतीय व अमेरिकन असलेल्या कबीरचे दोन्ही देशात चाहते होते. त्याच्या निधनाची बातमी समोर आल्यावर चाहते व त्याचे मित्र त्याला श्रद्धांजली वाहत आहेत.