अभिनेता अमेय वाघ त्याच्या विनोदबुद्धीसाठी चांगलाच ओळखला जातो. सोशल मीडियावरील त्याची प्रत्येक पोस्ट नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधून घेते. पत्नी साजिरी देशपांडेच्या वाढदिवसानिमित्त अमेयने इन्स्टाग्रामवर एक भन्नाट पोस्ट लिहिली आहे.

‘प्रिय साजिरी, तू कितीही गोड हसलीस तरी मी तुझ्याकडे बघिनंच असं नाही. तू प्रेमाने बोललीस तरी मी तुझं ऐकीनंच असं नाही. पण तुझी शप्पथ तू कितीही जेवलीस तरी तुझ्यासाठी आयुष्यभर भांडी घासीन. वाढदिवसाच्या चकचकीत शुभेच्छा! तुझाच, बायकोच्या ताटाखालचा वाघ,’ अशी पोस्ट लिहित अमेयने साजिरीसोबतचा फोटो पोस्ट केला आहे.

आणखी वाचा : ‘तारक मेहता..’मध्ये काम करण्यासाठी ‘आत्माराम तुकारामा भिडे’ यांनी सोडली होती दुबईतील नोकरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१३ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अमेय व साजिरीने लग्नगाठ बांधली. मराठी नाटक, चित्रपट, मालिका आणि वेब विश्वात आपल्या अभिनयाने छाप पाडणाऱ्या अमेयने २०१७ मध्ये साजिरीसोबत लग्न केलं.